Maharashtra आषाढी वारी

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी अनोखी कुस्ती स्पर्धा; २३ जुलैला वाखरीत श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी अनोखी कुस्ती स्पर्धा; २३ जुलैला वाखरीत श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा

वाखरीत रंगणार वारकरी कुस्तीचा थरार,विजेत्यांना सुवर्ण पदक,रोख बक्षिसे आणि वारकरी कुस्ती महावीर पुरस्कार

आषाढी वारी २०२६ निमित्त २३ जुलै रोजी वाखरी (पंढरपूर) येथे विश्वशांती गुरुकुल परिसरात ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. विविध वयोगटातील वारकरी मल्लांसाठी रोख बक्षिसे, पदके आणि विशेष पुरस्कार देण्यात येणार असून रात्री नाथांचे भारूड व गवळणी स्पर्धाही होणार आहेत.

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज | दि. २१ जुलै २०२६ : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी मल्लांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत असून विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी,श्री क्षेत्र आळंदी- देहू परिसर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार २३ जुलै २०२६ रोजी श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा दुपारी १.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत वाखरी ता.पंढरपूर येथील पालखी तळाशेजारील विश्वशांती गुरुकुल परिसरात होणार आहे. वारकरी मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.राहुल विश्वनाथ कराड आणि स्पर्धेचे संयोजक प्रा.विलास कथुरे यांनी केले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास दादा पवार, हिंदकेसरी दीनानाथसिंह, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर हे सन्माननीय प्रमुख पाहुणे असतील तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू तात्या जोशीलकर सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती कार्याध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड असतील.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वारकरी मल्लांनी २३ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता विश्वशांती गुरुकुलच्या मुख्य प्रवेशद्वारावर नोंदणी करावी. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी प्राध्यापक विलास कथुरे मो. नं.९८५०२११४०४ आणि पैलवान राहुल बिराजदार मो नं ८००७५९३४३४ यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धा १६ ते २५, २६ ते ३५, ३६ ते ४५, ४६ ते ५५, ५६ ते ६५ आणि ७० वर्षांवरील अशा विविध वयोगटांत होणार असून विजेत्यांना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके तसेच रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय ‘कुमार वारकरी कुस्ती महावीर’, ‘वारकरी कुस्ती महावीर’ आणि ‘ज्येष्ठ वारकरी कुस्ती महावीर’ या विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे.

विशेष आकर्षण म्हणून योगमहर्षी शेलारमामा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ७० वर्षांवरील तंदुरुस्त मल्लांसाठी विशेष कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राच्या लोककलेचे जतन करण्यासाठी रात्री ८ ते ११ या वेळेत संत एकनाथ महाराजांचे नाथांचे भारूड आणि गवळणी स्पर्धा देखील रंगणार आहेत.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.