Maharashtra Politics सामाजिक

अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम; लोकनेता पुरस्कार आणि 11 मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक मदत

अजितदादांच्या 68 व्या जयंती निमित्त 11 नवजात मुलींसाठी अजितदादा सुकन्या योजना, प्रत्येकी ₹ 22 हजारांची ठेव

अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम; लोकनेता पुरस्कार आणि 11 मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक मदत

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 68 व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी पंढरपूरमध्ये अजितदादा सुकन्या योजना जाहीर केली आहे.22 जुलै 2026 रोजी जन्मलेल्या 11 मुलींच्या नावे प्रत्येकी ₹22 हजारांची ठेव करण्यात येणार असून लोकनेता पुरस्कार ही सुरू करण्यात येणार आहे.

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज | दि. २१ जुलै २०२६ : लोकनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी समाजोपयोगी उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत 22 जुलै 2026 रोजी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जन्मलेल्या 11 नवजात मुलींच्या नावे प्रत्येकी ₹22 हजारांची ठेव करण्यात येणार आहे.

या योजनेला अजितदादा सुकन्या योजना असे नाव देण्यात आले असून संबंधित रक्कम मुलीच्या भविष्यासाठी ठेव स्वरूपात गुंतवली जाणार आहे. मुलीच्या विवाहाच्या वेळी ही ठेव काढता येणार असल्याने तिच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळणार आहे.

याशिवाय सोलापूर जिल्ह्यात उल्लेखनीय सामाजिक व सार्वजनिक कार्य करणाऱ्या एका व्यक्तीला दरवर्षी लोकनेता पुरस्कार देऊन गौरविण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे अजितदादा पवार यांच्या कार्याची प्रेरणा जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

अजितदादा सुकन्या योजनामध्ये नोंद झालेल्या मुलींच्या पालकांना ठेव पावत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद,युवक शहराध्यक्ष अमोल परबतराव, सारंग महामुनी, प्रदीप तांदळे आणि माऊली कुंभार प्रयत्न करत आहेत.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.