Maharashtra आषाढी वारी

आषाढी वारीत जखमी ८३ वर्षीय वारकऱ्याला पीएम राहत योजनेचा दिलासा;वेळापूरमध्ये तातडीने उपचार

आषाढी वारीत जखमी ८३ वर्षीय वारकऱ्याला पीएम राहत योजनेचा दिलासा;वेळापूरमध्ये तातडीने उपचार

पंढरपूर वारीदरम्यान अपघातग्रस्त वारकऱ्याला महात्मा फुले जनआरोग्य व PM RAHAT योजनेचा लाभ

आषाढी वारीदरम्यान माळशिरस बायपास येथे अपघातात जखमी झालेल्या ८३ वर्षीय वारकरी दगडुबा भोसले यांच्यावर वेळापूर येथील शिवम हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार करण्यात आले.महात्मा फुले जनआरोग्य योजना व PM RAHAT योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ देण्यात आला.

सोलापूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ जुलै २०२६ : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी येत असताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या ८३ वर्षीय वारकरी भाविकास ‘पीएम राहत’ (PM RAHAT) योजनेअंतर्गत तात्काळ उपचाराचा लाभ मिळाला आहे.

माळशिरस बायपासवर अपघात

दगडुबा दिगंबर भोसले वय ८३ वर्षे रा.भूमराळा ता.लोणार, जि. बुलढाणा हे पंढरपूरकडे येत असताना माळशिरस बायपास येथे अपघात झाला. अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन दोन्ही पायांच्या हाडांचे (Tibia & Fibula) फ्रॅक्चर झाले.

अपघातानंतर त्यांना तात्काळ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत शिवम हॉस्पिटल वेळापूर ता. माळशिरस येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची त्वरित तपासणी करून आवश्यक उपचार सुरू केले.

पीएम राहत योजनेतून मदत

रुग्णाचे वय,गंभीर दुखापत व उपचाराचा खर्च लक्षात घेऊन रुग्णालयाने तत्परतेने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पीएम राहत (PM RAHAT) योजने अंतर्गत रुग्णास उपचाराचा लाभ उपलब्ध करून दिला. त्यामुळे रुग्णास आर्थिक अडचण न येता आवश्यक, दर्जेदार व वेळेवर उपचार सुरू करता आले.

जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

आषाढी वारीच्या काळात पालखी मार्गावरील व पंढरपूर परिसरातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत रुग्णालये वारकरी भाविकांना तातडीने उपचार उपलब्ध करून देत आहेत.आवश्यकतेनुसार पीएम राहत योजनेचाही लाभ देण्यात येत आहे,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांनी दिली.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.