ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 : फलटणमध्ये वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी;डॉक्टरांनी दिली सेवाभावाची अनोखी भेट
फलटण डॉक्टर्स असोसिएशनचा वारकऱ्यांसाठी आरोग्य उपक्रम; मोफत तपासणी,औषधे व फिजिओथेरपीचा लाभ भाविकांना
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 निमित्त फलटण डॉक्टर्स असोसिएशनतर्फे कणकवंदना हॉस्पिटल येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात 470 वारकऱ्यांची तपासणी करून औषधे व फिजिओथेरपी सेवा देण्यात आली.
फलटण | ज्ञानप्रवाह न्यूज : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 निमित्त फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या सौजन्याने कणकवंदना हॉस्पिटल, फलटण येथे वारकरी भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
शिबिरात वारकऱ्यांना सर्वसाधारण आरोग्य तपासणी, आवश्यक औषधोपचार तसेच फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली. पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे भाविकांनी स्वागत केले.

या शिबिरात फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.निनाद दोशी,उपाध्यक्ष डॉ.चेतन गुंदेचा, महिला उपाध्यक्षा डॉ.शिल्पा गांधी, सचिव डॉ.निखिल गांधी, खजिनदार डॉ.सागर तेली यांच्यासह डॉ.संजय राऊत,जेष्ठ डॉ. जे.टी.पोळ,डॉ.विक्रांत रसाळ,डॉ. तेजस गांधी,डॉ.राजश्री नाळे,डॉ. संतोष गांधी, डॉ.अलोक गांधी, डॉ. महेश शिंदे, डॉ. दिव्या रसाळ, ज्येष्ठ डॉ.सुभाष दोशी,डॉ.अंकिता गांधी, डॉ. सई खराडे,डॉ.किरण शेंडे, फिजिओथेरपिस्ट डॉ.समीर खोत तसेच कणकवंदना हॉस्पिटलचे कर्मचारी आणि ओंकार भोईटे यांनी मोफत सेवा दिली.
शिबिराचे उद्घाटन डॉ.संजय राऊत यांच्या हस्ते झाले.यावेळी सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे निंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन केलेल्या या उपक्रमामुळे पालखी सोहळ्यातील सेवाभावाची परंपरा अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.













Add Comment