आषाढी वारी 2026: भाविकांच्या तक्रारींच्या तातडीच्या निवारणासाठी पंढरपुरात एकात्मिक नियंत्रण कक्ष कार्यान्वित
आषाढी वारी 2026 निमित्त पंढरपूरमध्ये भाविक व वारकऱ्यांच्या तक्रारींच्या तातडीच्या निवारणासाठी जुने बसस्थानक येथे एकात्मिक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. रस्ता, वीज, पाणी, स्वच्छता व पोलीस प्रशासनाशी संबंधित अडचणींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
भाविकांच्या तक्रारीसाठी जुने बसस्थानक येथे व्यवस्था, प्रशासकीय अडचणीसाठी स्वतंत्र भ्रमणध्वनी क्रमांक: 9403409908, 9403409930, 9403409936, 9403409952, 9403409961, 9403409962
पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ जुलै २०२६ : पंढरपूर शहरात दि.१५ जुलै ते २९ जुलै २०२६ दरम्यान संपन्न होणाऱ्या आषाढी वारी सोहळ्या साठी लाखो भाविक, वारकरी व दिंड्या दाखल होत आहेत.या पार्श्वभूमीवर भाविकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी जुने बसस्थानक येथे Integrated Control Room एकात्मिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
त्याचबरोबर वारीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर निर्माण होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. विविध विभागांच्या अडचणी निर्माण झाल्यास त्या अडचणींचे समन्वयाने निराकरण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसाठी स्वतंत्र भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यामध्ये रस्ता,वीज,स्वच्छता, पाणीपुरवठा, पोलीस प्रशासन आदी विभागांशी संबंधित अडचणी निर्माण झाल्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक: 9403409908, 9403409930, 9403409936, 9403409952, 9403409961, 9403409962
वारी कालावधीत भाविकांना तसेच प्रशासकीय यंत्रणेला कोणत्याही अडचणींचे जलद निराकरण व्हावे व सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा, यासाठी या एकात्मिक नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.











Add Comment