Maharashtra

भीमा नदीच्या वाढत्या पाणीपातळी मुळे स्थलांतरित नागरिकांसाठी मंदिर समितीकडून भोजनाची व्यवस्था; डॉ.प्रणिता भालके यांनी केली पाहणी

भीमा नदीच्या वाढत्या पाणीपातळी मुळे स्थलांतरित नागरिकांसाठी मंदिर समितीकडून भोजनाची व्यवस्था; डॉ.प्रणिता भालके यांनी केली पाहणी

भीमा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे स्थलांतरितांना दिलासा; मंदिर समितीकडून भोजन व आवश्यक सुविधांची व्यवस्था

भीमा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे व्यास नारायण झोपडपट्टीतील स्थलांतरित नागरिकांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भोजनाची व्यवस्था केली. नगराध्यक्षा व मंदिर समिती सदस्या डॉ.सौ.प्रणिता भालके यांनी भोजन व्यवस्थेची पाहणी करून नागरिकांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : भीमा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.या स्थलांतरित नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या डॉ.सौ. प्रणिता भगीरथ भालके यांनी भोजन व्यवस्थेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना त्यांनी दिल्या.

या प्रसंगी मंदिर समिती अधिकारी, कर्मचारी,नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पूर परिस्थितीत प्रशासन आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या समन्वयातून नागरिकांना वेळेवर मदत व भोजन उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पूरपरिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.