Maharashtra Politics

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट; विधानपरिषदेच्या कामकाजावर सविस्तर चर्चा

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट; विधानपरिषदेच्या कामकाजावर सविस्तर चर्चा

डॉ. नीलम गोऱ्हे-सचिन अहिर भेटीत विधानपरिषद आणि शिवसेना संघटन बळकटीवर भर

महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. विधानपरिषदेचे कामकाज अधिक प्रभावी करण्याबरोबरच शिवसेना संघटन बळकट करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी शिवसेना नेत्या व महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी श्रीगणेशाची मूर्ती,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. अहिर यांचा सन्मान केला तर श्री.अहिर यांनीही डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

या भेटीदरम्यान विधान परिषदेचे कामकाज अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्याबाबत तसेच संसदीय परंपरा आणि सभागृहाची गुणवत्ता अधिक बळकट करण्याच्या विविध पैलूंवर दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय करण्यात आला. तसेच शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद,शासनाच्या लोककल्याणकारी योजना याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे,युवासेना प्रदेश सचिव किरण साळी,आनंद गोयल, हेमंत बागुल,संदीप शिंदे,महिला आघाडीच्या कांताताई पांढरे,पूजा रावेतकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.