ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्वच्छता मोहीम
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रभाग क्रमांक ३ मध्ये काशीकापडे गल्लीतील खाटिक समाज मस्जिद परिसरासह विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
काशीकापडे गल्लीतील मस्जिद परिसर स्वच्छ; सौ. राजश्रीताई प्रताप गंगेकर व अक्षय गंगेकरांच्या पुढाकाराने आरोग्य विभागाची तत्पर कारवाई
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : ईद-ए-मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. काशीकापडे गल्ली येथील खाटिक समाज मस्जिद परिसरासह प्रभागातील विविध भागांमध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली.
प्रभागातील स्थानिक नागरिकांनी परिसरातील स्वच्छतेबाबत माजी नगराध्यक्षा व नगरसेविका सौ. राजश्रीताई प्रताप गंगेकर आणि नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची तत्काळ दखल घेत संबंधित आरोग्य विभागाला स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने स्वच्छतेचे काम सुरू केले.
ईद-ए-मिलादच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मस्जिद परिसर तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात स्वच्छता करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या समस्या आणि मागण्यांना प्राधान्य देऊन त्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सौ. राजश्रीताई प्रताप गंगेकर व अक्षय प्रताप गंगेकर यांनी सांगितले.













Add Comment