चिखलगावात ५१ रक्तदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी; दिवंगत रणजित दिघे,संजय शिनगारे, तानाजी देवघरे यांना अनोखी श्रद्धांजली
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान; चिखलगावात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, ५१ रक्तदात्यांचे योगदान
चिखलगावात शिवशक्ती मित्र मंडळ व स्वराज्यभूमी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून दिवंगत रणजित दिघे, संजय शिनगारे व तानाजी देवघरे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
चिखलगाव | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १४ सप्टेंबर २०२६ : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत चिखलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिवशक्ती मित्र मंडळ,चिखलगाव आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.१४ सप्टेंबर २०२६ रोजी सांस्कृतिक भवन, चिखलगाव गावठाण-वरचे आवाड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिवंगत रणजित दिघे,संजय शिनगारे आणि तानाजी देवघरे यांच्या अचानक निधनाने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या पवित्र स्मृतींना सामाजिक उपक्रमातून श्रद्धांजली अर्पण करण्याचा उपक्रम उपस्थितांसाठी भावनिक ठरला.
५१ रक्तदात्यांचे रक्तदान
या शिबिरात तब्बल ५१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदत मिळावी आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने रक्तदात्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली.
शिबिराचे उद्घाटन रघुनाथ आप्पा धोंडे,अर्जुन दिघे आणि धनाजी शिनगारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाश धोंडे होते.
यावेळी कृष्णराज धोंडे, नितीन धोंडे, विलास धोंडे, वैभव धोंडे, विजय धोंडे, संजय धोंडे, संकेत धनावडे,क्षितीज धोंडे, शुभम गोळे, किरण धोंडे,दादा दिघे,रोहित धोंडे, सचिन दिघे, आनंदा धोंडे,प्रमोद धोंडे,संदीप धोंडे यांच्यासह स्वराज्यभूमी प्रतिष्ठानचे शिवपाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तसंकलनासोबत गरजूंना मदतीचा उपक्रम
स्वराज्यभूमी प्रतिष्ठानकडून गडकिल्ले, समाधी आणि वारसा संवर्धनासोबतच शैक्षणिक, कला, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रातही विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रतिष्ठानच्या माहितीनुसार आजवर ४४७ हून अधिक गरजू व्यक्तींना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात आले असून १,७५१ हून अधिक रक्तपिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले आहे.
रक्तदानासारख्या उपक्रमातून गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळण्या बरोबरच समाजातील तरुणांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते.त्यामुळे अशा उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद ही समाजाच्या सकारात्मक वाटचालीची नांदी मानली जात आहे.
शिवशक्ती मित्र मंडळ, चिखलगाव आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठान यांच्या या उपक्रमातून सामाजिक कार्या सोबतच दिवंगत व्यक्तींच्या स्मृती जपण्याचा आदर्श संदेश देण्यात आला.











Add Comment