Maharashtra श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन

नामवंत गायक-गायिकांच्या सुरेल गायनाने रंगणार सहा दिवसीय संगीत महोत्सव

भक्ती,संगीत आणि अध्यात्माचा सुरेल संगम! विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा गणेशोत्सव संगीत महोत्सव

पंढरपुरात श्री विठ्ठल-रुभक्तीक्मिणी मंदिर समितीतर्फे १५ ते २३ सप्टेंबरदरम्यान सहा दिवसीय गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन. नामवंत कलाकारांची गायन सेवा ,पंढरपूरचे सांस्कृतिक वातावरण भक्ती आणि संगीताने भारून जाणार आहे.

पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ सप्टेंबर २०२६ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्यावतीने श्री गणेशाच्या आगमनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सहा दिवसीय गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संगीत महोत्सव श्री संत तुकाराम भवन पंढरपूर येथे सायंकाळी ७.३० वाजता होणार असून नामवंत गायक-गायिकांच्या सुरेल गायनाची मेजवानी कलारसिकांना मिळणार आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सन्माननीय सदस्य,कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव व व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संगीत महोत्सवामध्ये मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी भजनसम्राट शंकरराव वैरागकर नाशिक यांचा स्वरविठ्ठल, बुधवार, दि.१६ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक जयतीर्थ मेऊंडी हुबळी यांचा अभंगरंग हा कार्यक्रम सादर होणार आहे.

रविवार दि.२० सप्टेंबर रोजी स्वाती रांजेकर यांचा करावा विठ्ठल, सोमवार दि.२१ सप्टेंबर रोजी पंढरपूरचे स्थानिक कलाकार गणेश गोडबोले यांचा स्वरपंढरी,मंगळवार दि.२२ सप्टेंबर रोजी श्रृती पाटील मुंबई यांचा विठ्ठल वारी आणि बुधवार दि.२३ सप्टेंबर रोजी उन्मेष शहाणे सोलापूर प्रस्तुत कल्चर शिदोरी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी गायन सेवा अर्पण करण्यासाठी येणाऱ्या या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणामुळे पंढरपूरच्या सांस्कृतिक वातावरणात भक्ती, संगीत आणि अध्यात्माचा सुरेल संगम अनुभवता येणार आहे.

या गणेशोत्सव संगीत महोत्सवाचा कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

भक्ती,संगीत आणि अध्यात्माचा सुरेल संगम! विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा गणेशोत्सव संगीत महोत्सव

पंढरपुरात श्री विठ्ठल-रुभक्तीक्मिणी मंदिर समितीतर्फे १५ ते २३ सप्टेंबरदरम्यान सहा दिवसीय गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन. नामवंत कलाकारांची गायन सेवा

पंढरीच्या भक्तिमय वातावरणात आता सुरांची बरसात होणार आहे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित सहा दिवसीय संगीत महोत्सवात नामवंत गायक – गायिकांच्या सादरीकरणाने पंढरपूरचे सांस्कृतिक वातावरण भक्ती आणि संगीताने भारून जाणार आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.