Maharashtra

हेल्मेट दंडासाठी नव्हे,जीव वाचवण्यासाठी : एसपी अतुल कुलकर्णींचा संदेश; पालखी मार्गावर वृक्षारोपण आणि अपघात जनजागृती अभियान

हरीतवारी संकल्पनेतून संत गजानन महाराज पालखी मार्गावर वृक्षारोपण; सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून हेल्मेट व रस्ता सुरक्षा जनजागृती

हेल्मेट दंडासाठी नव्हे,जीव वाचवण्यासाठी : एसपी अतुल कुलकर्णींचा संदेश; पालखी मार्गावर वृक्षारोपण आणि अपघात जनजागृती अभियान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरीतवारी संकल्पनेतुन श्री.संत गजानन महाराज पालखी मार्गावर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांचे हस्ते कामती व मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत वृक्षारोपणास प्रारंभ तसेच रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर|ज्ञानप्रवाह न्यूज: सोलापूर जिल्ह्यात व भागात वाढत्या रस्ते अपघाताच्या पाश्वभूमीवर तसेच हेल्मेट न घातल्यामुळे होणाऱ्या जीवितहानीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने कामती पोलीस स्टेशनच्या वतीने एक आगळा वेगळा व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात श्रीकृष्ण प्रशालेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रस्ता सुरक्षा पर्यावरण संवर्धन आणि सेंद्रिय शेतीचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला.

सदर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या भीषण अपघाताचे प्रतीक म्हणून तयार करण्यात आलेला दुचाकी अपघाताचा देखावा (प्रतिकृती होय. या देखाव्यासोबत अपघाताची कारणे हेल्मेट चे महत्व वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित वाहन चालवण्याबाबतचा संदेश देणारे माहिती फलक लावण्यात आलेले होते टोल नाक्यावरून ये जा करणारे वाहनचालक यांनीदेखील हा कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने पाहिला व रस्ता सुरक्षिततेचा संदेश स्वीकारला.

 

यावेळी आषाढी वारीचे सांस्कृतिक दर्शन घडवीत हरितक्रांतीची वारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थिनी वारकरी यांच्या वेशात पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड पाणी संवर्धन व सेंद्रिय शेतीचा संदेश देत जनजागृती केली कार्यक्रमात दरम्यान रस्त्याचे दुतर्फा वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापुर ग्रामीण यांनी उपस्थिती व त्यांनी दिलेला वाहतुकीबाबत रस्ता सुरक्षा बाबत हेल्मेटचा वापर याबाबत सेंद्रिय शेतीचा वापर याबाबतचे प्रबोधनपर संदेश हा महत्त्वाचा मुद्दा ठरला हेल्मेट हा दंड टाळण्यासाठी नव्हे तर जीव वाचवण्यासाठी आहे हा मोलाचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला तसेच प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे व जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीचा वापर करावा असे आव्हान करण्यात आले. या कार्यक्रमामुळे रस्ता सुरक्षा, हेल्मेट वापर, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला उपस्थित नागरिकांनी या अभिनव कार्यक्रमाचे कौतुक करून अशा जनजागृती कार्यक्रमाचे मोहीम सातत्याने राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

तसेच मंगळवेळा पोलीस ठाणे कडील अधिकारी व कर्मचार्यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हरीतवारी संकल्पनेतुन श्री. संत गजानन महाराज पालखी मार्गावर सोलापूर ते मंगळवेढा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ चे लगत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, इंग्लिश स्कुल मंगळवेढा येथील एनसीसी चे विद्यार्थी, शिक्षक,माजी सैनिक,एनएचएआय स्टाफ,वृक्ष प्रेमी नागरीकांचे उपस्थितीत दि.१६/०७/ २०२६ रोजी दुपारी १३.०० वा ते १५.०० वा. दरम्यान वड,पिंपळ,कडू लिंब इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे श्री.संत दामाजी साखर कारखाना फाटा मंगळवेढा या ठिकाणी अपघातग्रस्त चारचाकी वाहनाचा डीस्प्ले आणि त्यासोबत वाहतुकीच्या नियमांचे फलक उभारून,रोडने जाणारे- येणारे वाहन चालकांचे लक्ष आकर्षित करून त्यांनी त्याचे ताब्यातील वाहन सुरक्षित व नियमांचे पालन करून चालवुन अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याचे नियोजन केले.सदर ठिकाणी उपस्थित इंग्लिश स्कुल, मंगळवेढा येथील एन.सी.सी.चे विद्यार्थी, शिक्षक,प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया प्रतिनिधी, माजी सैनिक,एनएच एआय स्टाफ, वृक्ष प्रेमी,नागरीक यांना रस्त्याने वाहन चालविताना घ्यावयाच्या दक्षता याबाबत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कामती पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे, कामती पोलीस स्टेशनचे कर्मचारी वर्ग, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी वर्ग, NHAI चे अधिकारी,बालाजी अमाईन्स चे समन्वय अधिकारी अनिल विपत, कामती पोलीस स्टेशन हद्दीतील पत्रकार ,श्रीकृष्ण प्रशालेचे शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे,मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे तसेच इंग्लिश स्कुल मंगळवेढा येथील एनसीसी चे विद्यार्थी,शिक्षक,माजी सैनिक, एनएचएआय स्टाफ,वृक्ष प्रेमी नागरिक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.