Maharashtra Politics

डॉ.कुमार सप्तर्षी यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली; गांधी भवन येथे घेतले अंत्यदर्शन

डॉ.कुमार सप्तर्षी यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली; गांधी भवन येथे घेतले अंत्यदर्शन

पुणे |ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २० जुलै २०२६ : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिवाचे आज पुण्यातील गांधी भवन येथे अंत्यदर्शन घेण्यासाठी शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी डॉ. सप्तर्षी यांच्या पत्नी डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, पुत्र कबीर सप्तर्षी, सून तसेच नातवास भेटून त्यांचे सांत्वन केले व या दुःखद प्रसंगी संपूर्ण कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. तसेच विविध जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचे सांत्वन देखील डॉ.गोऱ्हे यांनी केले.

डॉ. गोऱ्हे यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सामाजिक परिवर्तन, लोकशाही मूल्ये आणि गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे सांगत त्यांना विनम्र अभिवादन केले.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.