Maharashtra आषाढी वारी

पंढरपूरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी भेट; वारकरी सुविधांसाठी नगरपरिषदेला ₹5 कोटींचा विशेष निधी मंजूर – नगराध्यक्षा प्रणितीताई भालके

पंढरपूरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी सुविधांसाठी नगरपरिषदेला ₹5 कोटींचा विशेष निधी केला मंजूर

आषाढी वारी 2026 : चंद्रभागा स्वच्छता, वारकरी सुविधा आणि पर्यावरण संवर्धनासाठी पंढरपूर नगरपरिषदेला ₹5 कोटींचे अनुदान – नगराध्यक्षा प्रणितीताई भालके

पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ जुलै २०२६ : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आषाढी वारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर येथे आले असता पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ.प्रणिताताई भालके यांनी वारकरी भाविकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी निधीची मागणी केली असता या मागणीची उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ दखल घेत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विशेष अनुदान पंढरपूर नगरपरिषदेस ₹ ५ कोटींचा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामुळे देशभरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असून वर्षांमध्ये चार यात्रा त्यात आषाढी, कार्तिकी,माघ व चैत्र वारी भरतात.आषाढी वारी सर्वात मोठी असून सुमारे १५ ते २० लाख भाविक येत असतात. भाविक भक्तांना चांगल्या सोईसुविधांबरोबर चंद्रभागा नदीपात्र व परिसराची स्वच्छता,पर्यावरण संवर्धन व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.मंजूर झालेल्या या निधीतून वारकर्यांना चांगल्या सुविधा पुरविणे,चंद्रभागा नदीपात्रा तील गाळ,कचरा व इतर नदी परिसराची नियमित स्वच्छता तसेच स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांनाही स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणाचा लाभ मिळणार असल्याचे नगराध्यक्षा सौ प्रणिता भालके यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत,साईनाथभाऊ अभंगराव,विठ्ठल साखर कारखान्या चे माजी चेअरमन भगीरथ भालके, माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील,मोहोळ मतदार संघाचे आमदार राजू खरे, पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक राहुल शिंदे नाईक,लोकेश यादव, विनायक देवमारे,सुधीर धोत्रे,संजय बंदपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

जनतेच्या व भाविकांच्या हिताचा विचार करून चंद्रभागा नदीची स्वच्छता महत्त्वपूर्ण मागणी मान्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.या निर्णयामुळे पंढरपूरच्या स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या कामांना मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ₹ ५ कोटींचा निधी मंजूर झाल्याबद्दल नगराध्यक्षा सौ प्रणिता ताई भालके यांनी आभार व्यक्त केले.भाविक व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.