उमरखेड : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पार्टीच्या संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत, शुक्रवारी पक्षीय आढावा बैठक झाली. राजू जैस्वाल यांच्या घरी झालेल्या, बैठकीला प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते. लवकरच पक्षाचा भव्य मेळावा घेण्याचे ठरले असून, या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती, समोर आली आहे.
उमरखेड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा विस्तार व सध्याची वाटचाल याबाबत प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी, १७ जुलैला विधानसभा अध्यक्ष राजूभैया जैस्वाल यांच्या निवासस्थानी आढावा बैठक घेतली. या आढाव्यासाठी स्वतः प्रदेश अध्यक्ष पोहचल्याने, कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. शिंदे यांनी एसआयआर बाबतही विस्तृत मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना केले आहे. भविष्यात राष्ट्रवादीचे मोठा मेळावा घेण्याचे ठरले आहे.
या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रदीप पाटील देवसरकर, ओबीसी सेलचे विदर्भ प्रमुख भास्करराव पंडागळे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा विधानसभा अध्यक्ष राजूभैया जयस्वाल, तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील कनवाळे, गोविंद इंगोले यांच्यासह, पक्षाचे सर्व पदाधिकारी व सेल प्रमुख उपस्थित होते.











Add Comment