उमरखेड : यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केल्यानुसार दि.26 जुलै रोजी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक राजे छत्रपती संभाजी उद्यानातील सभागृहात, 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली .
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्वा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यामध्ये दि.22 जुलै, 25 जुलै व 26 जुलै 2026 या तीन दिवसांपैकी एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय समाधान शिबीराचे आयोजन करण्याबाबत शासनाने निर्देशीत केले होते. तसेच जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी निर्देशीत केल्यानुसार 82-उमरखेड विधानसभा मतदार संघामध्ये दि. 26 जुलै रोजी सकाळी 10.00 वा. राजस्थानी भवन, उमरखेड येथे एक दिवसीय समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना देण्याच्या अनुषंगाने आज रोजी दि. 16 जुलै रोजी दुपारी 12.00 वा. राजे छत्रपती संभाजी महाराज नगर परिषद उद्यानातील सभागृहात महागांव रोड उमरखेड येथे बैठक पार पडली या बैठकीमध्ये उपविभागिय अधिकारी सखाराम मुळे यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार आर यु सुरडकर,गटविकास अधिकारी किरण कोळपे , न.प मुख्याधिकारी डॉ .अजय कुरवाडे , तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते ,उपविभागीय विद्युत अभियंता प्रशांत आंबटकर ,तालुका आरोग्य अधिकारी राजू दुबे ,भूमी अभिलेख उपअधीक्षक बाळू आडे तसेच महागाव तालुक्यातील सर्व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते











Add Comment