फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज युवा प्रकोष्ठची नवी कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातून 8 जणांची राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून निवड
संदेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र-गोवा युवा प्रकोष्ठाची कार्यकारिणी घोषित; पंढरपूरच्या नमन गांधींसह 33 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज युवा प्रकोष्ठाच्या राष्ट्रीय व महाराष्ट्र- गोवा प्रोव्हिन्स कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून आठ जणांची राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून निवड झाली असून संदेश रविंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
टेंभुर्णी जि.सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज :फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज युवा प्रकोष्ठाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वैभव गोवाडिया सागवाडा राजस्थान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्यकारिणी आणि महाराष्ट्र-गोवा प्रोव्हिन्सची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून आठ जणांची राष्ट्रीय निमंत्रित पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल समाजबांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र – गोवा प्रोव्हिन्सच्या अध्यक्षपदी संदेश रविंद्र गांधी भिमानगर जि.सोलापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी हितेश दोशी टेंभुर्णी, नमन गांधी पंढरपूर, मयूर शहा म्हसवड, शौनक शहा मुंबई, सम्मेद गांधी पुणे, सनम जैन चोपडा आणि चिराग दोशी गोवा यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच मंत्री, सहमंत्री, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख, सहप्रसिद्धी प्रमुख आणि 33 सदस्यीय कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्रातून निमंत्रित राष्ट्रीय पदाधिकारी : संदेश रविंद्र गांधी भिमानगर, संदेश विजय दोशी बारामती, तेजस प्रितम गांधी अकलूज, अक्षय संदीप वागजकर, दौंड, अभय इंदरमल गांधी पुणे,अनिकेत श्रेणिक शहा,छ. संभाजीनगर, साहिल प्रशांत शहा छ.संभाजीनगर,बादल आकाश शहा, मुंबई.
फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र – गोवा प्रोव्हींन्स अध्यक्ष म्हणून संदेश रविंद्र गांधी भिमानगर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र – गोवा प्रोव्हींन्स कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -अध्यक्ष संदेश रविंद्र गांधी भिमानगर,उपाध्यक्ष हितेश नंदकुमार दोशी टेंभुर्णी,नमन धर्मेंद्र गांधी पंढरपूर, मयूर महावीर शहा म्हसवड,शौनक संतोष शहा मुंबई, सम्मेद अमृतराज गांधी पुणे,सनम राहुल जैन चोपडा,चिराग भारत दोशी गोवा तर यश भारत शहा बार्शी मंत्री, सहमंत्री आकाश मनोज गांधी करमाळा,कोषाध्यक्ष योगराज अजित गांधी, अकलूज,,सहकोषाध्यक्ष पुष्कर विरकुमार दोशी सदाशिवनगर, प्रसिद्धी प्रमुख सम्मेद राजकुमार शहा पापरी तर सहप्रसिद्धी प्रमुख* अक्षय विलास दोशी जंक्शन यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून केतन राजकुमार दोशी अकलूज,ॲड. अक्षय दिलीप दोशी माढा, कपिल अजित गांधी अकलूज, पियुष योगेश गांधी अकलूज,विनोद मोहनलाल दोशी खटाव, डॉ.चिराग मनेष गांधी वालचंदनगर, सुहास अशोक जैन धुळे, चंदन शांतीलाल जैन सोनगीर, अरिहंत सुनील फडे श्रीपूर,सौरभ प्रविण दोशी कुर्डूवाडी, यशराज प्रदीप गांधी फलटण, अक्षय उज्वलकुमार दोशी नातेपुते, आशिष धर्नेंद्र गांधी भवानीनगर, वृषल महावीर दोशी टेंभुर्णी,आदिल प्रमोद गांधी वडूज, शुभम किशोर मेहता सोलापूर, युवराज सुनील शहा सोलापूर, मनोज श्रेयांश गांधी बारामती, तीर्थंकर णमोकार दोशी, भिगवण.
नव्या पदाधिकाऱ्यांमार्फत समाजाची एकता,संघटन,प्रगती आणि समाजसेवा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच महाराष्ट्र-गोवा प्रोव्हिन्सच्या नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.











Add Comment