थॉमस हार्डी यांच्या कादंबऱ्यांतील वर्गसंघर्षावर संशोधन;प्रा.सैफअली विजापुरे यांना इंग्रजी विषयात पीएचडी
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्रा.सैफअली विजापुरे यांना पीएचडी;थॉमस हार्डी साहित्याचा चिकित्सक अभ्यास
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील इंग्रजी विभागाचे प्रा.सैफअली विजापुरे यांना Class Conflict in Selected Novels of Thomas Hardy या संशोधनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : रयत शिक्षण संस्थेच्या अधिकार -प्रदत्त स्वायत्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक प्रा.सैफअली विजापुरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने इंग्रजी विषयातील पीएचडी पदवी प्रदान केली आहे.त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय Class Conflict in Selected Novels of Thomas Hardy असा असून या संशोधनासाठी त्यांना प्रो.डॉ.संजय शिवशरण यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा.विजापुरे यांनी आपल्या संशोधनामध्ये इंग्रजी साहित्यातील महान कादंबरीकार थॉमस हार्डी यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील वर्गसंघर्ष, सामाजिक विषमता आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या संदर्भात मानवी जीवनातील संघर्षमूल्यांचा सखोल चिकित्सक अभ्यास केला आहे. त्यांच्या या संशोधनामुळे हार्डी यांच्या साहित्यकृतींमधील सामाजिक वास्तव, वर्गीय जाणीवा आणि मानवी मूल्यांच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल, असे मत साहित्य क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
प्रा.सैफअली विजापुरे हे प्रा.डॉ. फैमिदा विजापुरे यांचे चिरंजीव असून त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. समाधान माने,प्रा.डॉ. धनंजय साठे, प्रा.डॉ.महादेव कोरी,प्रा.धनंजय वाघदरे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही प्रा. विजापुरे यांचा गौरव करून अभिनंदन केले.











Add Comment