आषाढी वारीत वारकरी सेवेला मानवंदना; विवेकभैय्या कोल्हे मित्र परिवाराचा महाप्रसाद व स्वागत सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त विवेकभैय्या कोल्हे मित्र परिवाराकडून महाप्रसाद वाटप; वारकरी सेवेतून समाजसेवेचा आदर्श
आषाढी वारी 2026 निमित्त पंढरपुरात विवेकभैय्या कोल्हे मित्र परिवाराकडून वारकरी भाविकांसाठी महाप्रसाद वाटप व स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. सेवाकार्यात अनेक मान्यवर व स्वयंसेवकांचा सहभाग
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरी नगरीत आगमन झालेल्या लाखो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी विधानपरिषद आमदार विवेकभैय्या कोल्हे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित महाप्रसाद वाटप व स्वागत सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सेवाकार्यात मोठ्या संख्येने वारकरी, स्वयंसेवक आणि समाजातील विविध मान्यवरांनी सहभाग नोंदविला.

विधानपरिषदेवर नव्याने बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विवेकभैय्या कोल्हे यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेल्या या उपक्रमात वारकरी भाविकांचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले. महाप्रसादाचे नियोजनबद्ध वाटप करून वारकरी सेवा हीच पांडुरंग -रखुमाईची खरी सेवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला.
या सेवाकार्यात सहभागी झालेल्या सर्व वारकरी बंधू-भगिनी, मान्यवर, सेवेकरी, स्वयंसेवक तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आयोजक रमाकांत वाकचौरे यांनी आभार मानले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.राजेश फडे, विजय देशपांडे,देशपांडे बंधू,रमाकांत वाकचौरे,संपतराव वहाडणे, सदाशिव उगले सर, संजय चौधरी, महेश वहाडणे आणि मित्र परिवार यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सेवाभावी कार्याचे उपस्थितांनी कौतुक करत अभिनंदन केले.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे प्रतीक असून अशा सेवाभावी उपक्रमांमुळे वारकऱ्यांना दिलासा मिळत असून समाजात सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.












Add Comment