Education Maharashtra

महाराष्ट्रातील 1,068 सरकारी शाळा बंदीच्या यादीत ? सत्यजीत तांबे म्हणाले – शाळा बंद नकोत, मजबूत व्हायला हव्यात

सरकारी शाळा बंद करण्याऐवजी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याची गरज ; आमदार सत्यजीत तांबे

महाराष्ट्रातील 1,068 सरकारी शाळा बंदीच्या यादीत ? सत्यजीत तांबे म्हणाले – शाळा बंद नकोत, मजबूत व्हायला हव्यात

देशभरात 17 हजारांहून अधिक आणि महाराष्ट्रातील 1,068 सरकारी शाळा बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारी शाळा बंद करण्याऐवजी त्यांना अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. दर्जेदार शिक्षणासाठी सरकारी शाळा टिकवण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ जुलै २०२६ : देशभरात गेल्या पाच वर्षांत १७ हजारांहून अधिक सरकारी शामुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ जुलै २०२६ : देशभरात गेल्या पाच वर्षांत १७ हजारांहून अधिक सरकारी शाळा बंद झाल्याची बाब गंभीर असून महाराष्ट्रातील १,०६८ सरकारी शाळांचाही त्यामध्ये समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारी शाळा बंद करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली.ळा बंद झाल्याची बाब गंभीर असून महाराष्ट्रातील १,०६८ सरकारी शाळांचाही त्यामध्ये समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारी शाळा बंद करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली.

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार तांबे म्हणाले की, सरकारी शाळा बंद करणे हा उपाय होऊ शकत नाही. त्याऐवजी शाळांचा दर्जा कसा उंचावता येईल, विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल आणि पालकांचा विश्वास पुन्हा सरकारी शिक्षण व्यवस्थेवर कसा निर्माण होईल, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

सरकारी शाळा टिकल्या तरच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल.त्यामुळे शाळा बंद करण्या ऐवजी त्या अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.शाळा बंद होऊ नयेत… शाळा मजबूत व्हायला हव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.