Maharashtra

पंढरपूरच्या नव्या अपर पोलीस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे; सांगोला, मंगळवेढा, माळशिरससह चार तालुक्यांची जबाबदारी

पंढरपूरच्या नव्या अपर पोलीस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे; सांगोला, मंगळवेढा, माळशिरससह चार तालुक्यांची जबाबदारी

पंढरपूरला स्वतंत्र अपर पोलीस अधीक्षक कार्यालय; पहिल्या अपर पोलीस अधीक्षक म्हणून प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती

पंढरपूरसाठी स्वतंत्र अपर पोलीस अधीक्षक कार्यालय मंजूर झाल्यानंतर प्रेरणा कट्टे यांची पहिल्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस तालुक्यांची जबाबदारी त्यांच्या अखत्यारित राहणार आहे.

सोलापूर | पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूरसह परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाने पंढरपूरसाठी स्वतंत्र अपर पोलीस अधीक्षक कार्यालयासह आवश्यक मनुष्यबळ मंजूर केले असून, या नव्या कार्यालयाच्या पहिल्या अपर पोलीस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस या चार तालुक्यांसाठी स्वतंत्र अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या परिसरातील पोलीस प्रशासन अधिक प्रभावी आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.

नव्याने मंजूर झालेल्या या कार्यालयाची जबाबदारी आता प्रेरणा कट्टे सांभाळणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील अभ्यासू आणि अनुभवी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

विविध ठिकाणी उल्लेखनीय सेवा

प्रेरणा कट्टे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस सेवेत प्रवेश केला. आपल्या सेवाकाळात त्यांनी नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर आणि पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी विविध पदांवर काम केले आहे.

विविध जिल्ह्यांमध्ये आणि महत्त्वाच्या पोलीस विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव असल्याने पंढरपूरच्या नव्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

चार तालुक्यांच्या पोलीस प्रशासनाला मिळणार बळ

पंढरपूर हे धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे शहर असून वर्षभर येथे मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात. त्याचबरोबर सांगोला,मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यांचा मोठा भौगोलिक विस्तार आहे.

स्वतंत्र अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामुळे या चार तालुक्यां मधील पोलीस प्रशासनातील समन्वय अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, तपास आणि विविध पोलीस यंत्रणांमधील समन्वयाच्या दृष्टीने या कार्यालयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पंढरपूरला स्वतंत्र अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ मंजूर झाल्याने परिसरातील नागरिकांना पोलीस प्रशासन अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.