Maharashtra सामाजिक

स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यात 10 ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे; मोतीबिंदू शस्त्रक्रियाही मोफत

स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यात 10 ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे; मोतीबिंदू शस्त्रक्रियाही मोफत

11 ते 22 ऑगस्टदरम्यान पंढरपूर तालुक्यात आरोग्य सेवेचा महायज्ञ; 10 गावांत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 11 ते 22 ऑगस्टदरम्यान पंढरपूर तालुक्यात 10 ठिकाणी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिरे

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑगस्ट २०२६ :कर्मयोगी श्रद्धेय माजी आमदार स्व.सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिवार युवा मंच, पंढरपूर यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया (लेन्ससहित) तसेच सर्व रोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधीत पंढरपूर तालुक्यातील तब्बल 10 ठिकाणी ही आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या गावाजवळच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणीची सुविधा मिळावी,हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमाची माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली. शंकरराव साळवे नेत्र रुग्णालय सोलापूर (एच.व्ही.देसाई आय इन्स्टिट्यूटचा प्रकल्प) यांच्या विशेष सहकार्याने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

मोतीबिंदू आढळल्यास पुढील उपचारही मोफत

शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार असून तपासणी दरम्यान मोतीबिंदू आढळून आल्यास संबंधित रुग्णांना पुढील मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

रुग्णांना अद्ययावत सर्वोपचार रुग्णालयात नेऊन आवश्यक शस्त्रक्रिया मोफत करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

नेत्र तपासणीसोबतच नागरिकांच्या विविध आजारांची तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. सोलापूर आणि पुणे येथील डॉक्टर या शिबिरांमध्ये सहभागी होणार आहेत.

कुठे आणि कधी होणार शिबिर ?

तारीख| ठिकाण
11 ऑगस्ट| तुंगत
12 ऑगस्ट| गादेगाव
13 ऑगस्ट| खर्डी
14 ऑगस्ट| उंबरे-पागे
16 ऑगस्ट| रांजणी
18 ऑगस्ट| कासेगाव
19 ऑगस्ट| रोपळे
20 ऑगस्ट| पुळुज
21 ऑगस्ट| करकंब ग्रामीण रुग्णालय
22 ऑगस्ट| भाळवणी

या सर्व ठिकाणी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिरे होणार आहेत.

मोतीबिंदूमुक्त,डोळस पंढरपूरचा संकल्प

गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर तालुका मोतीबिंदूमुक्त आणि डोळस करण्याचा संकल्प प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून यंदाही ग्रामीण भागात व्यापक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी सामाजिक, सहकार आणि सार्वजनिक जीवनात केलेल्या कार्याच्या स्मृती जपत आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या गावाजवळ आयोजित करण्यात आलेल्या या मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रणव परिचारक यांच्यावतीने करण्यात आले आहे.

आरोग्य तपासणी वेळेत करून आवश्यक उपचार मिळाल्यास अनेक गंभीर आजारांचे निदान सुरुवातीलाच होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.