kolhapur Maharashtra Politics

डी.वाय. पाटील साहेबांचे प्रचंड प्रेम आणि मार्गदर्शन लाभले; असंख्य तरुणांना त्यांनी दिशा दिली : आमदार सत्यजीत तांबे

डी.वाय.पाटील साहेबांचे प्रचंड प्रेम आणि मार्गदर्शन लाभले; असंख्य तरुणांना त्यांनी दिशा दिली : आमदार सत्यजीत तांबे यांची श्रद्धांजली

कोल्हापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑगस्ट २०२६ : शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांच्या पंचक्रिया विधीस आज आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉ.डी.वाय.पाटील यांच्याशी आपले अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे प्रचंड प्रेम आणि मार्गदर्शन लाभले, अशी भावना आमदार तांबे यांनी व्यक्त केली.

स्व.डी.वाय.पाटील साहेबांनी माझ्यासारख्या देशातील असंख्य तरुणांवर जिवापाड प्रेम केले. व्यवसाय,शिक्षण यांसह जीवनाच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी नेहमी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या सोबतच्या सर्व आठवणी मनात दाटून आल्या,असे आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.

यावेळी आमदार सतेज (बंटी) पाटील, संजय पाटील, डॉ. विजय पाटील यांच्यासह समस्त पाटील परिवाराशी संवाद साधून आमदार तांबे यांनी सहवेदना व्यक्त केल्या.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.