Maharashtra

पुणे मुंबई कनेक्टिंग लिंकवर बुधवारी तीन तास वाहतूक बदल

पुणे मुंबई कनेक्टिंग लिंकवर बुधवारी तीन तास वाहतूक बदल

बुधवार दि.१२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत देखभाल- दुरुस्तीचे काम तसेच मॉक ड्रिल आयोजित

पुणे|जिमाका – यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या पुणे ते मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर बुधवार दि.१२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत देखभाल- दुरुस्तीचे काम तसेच मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत कनेक्टिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. दरम्यान, कनेक्टिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.

वाहनचालकांनी नियोजित कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीदरम्यान काही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाशी ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.