नारायण चिंचोली येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; तिरंगा पदयात्रेने गाव दुमदुमले
भारत माता की जय च्या जयघोषाने नारायण चिंचोली झाले देशभक्तीमय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नारायण चिंचोली येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. तिरंगा पदयात्रा, ध्वजारोहण, विद्यार्थ्यांच्या कवायती आणि देशभक्तीपर कार्यक्रमांनी गाव दुमदुमले
नारायण चिंचोली ता.पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ ऑगस्ट : हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ७.१५ वाजता गावातून भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी,गावातील प्रमुख पदाधिकारी तसेच ग्राम प्रशासनातील अधिकारी सहभागी झाले होते.
हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा, मनात राष्ट्रभक्तीची भावना आणि भारत माता की जय च्या जयघोषाने संपूर्ण नारायण चिंचोली गावाचे वातावरण देशभक्तीमय झाले होते.

ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी सैनिक गोपीनाथ हिंगमिरे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. देशभक्तीपर गीते तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या भाषणांनी उपस्थित नागरिकांची मने जिंकली.
यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे म्हणाले,आजची मुले ही उद्याचे भविष्य आहेत.त्यांच्यात मला भविष्यातील डॉक्टर,शास्त्रज्ञ, इंजिनिअर,आयएएस,आयपीएस अधिकारी दिसत आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात गावात कोणतीही कमतरता राहणार नाही यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहोत.
माजी सैनिक लक्ष्मण कोल्हे यांनी भारताच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या आठवणी सांगत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली.
यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
देशाची एकता,अखंडता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये देशाप्रती असलेला सन्मान आणि प्रेम अधिक दृढ झाले.

कार्यक्रमास गावच्या प्रशासक तथा सरपंच नर्मदा ताई लक्ष्मण धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, माजी सरपंच विठ्ठल माने,बळवंत धनवडे,सौदागर गुंड,लहू नलवडे, नितीन गुंड, शिवाजी भोसले, आप्पासाहेब वाघमोडे,गोपीनाथ हिंगमिरे, विष्णुपंत माने, हरी माने, महेश माने, मुकुंद घाडगे, दत्तात्रय बनसोडे, बाळू बनसोडे, सचिन भडकवाड, ग्रामपंचायत अधिकारी संतोष गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी अनभुले भाऊसाहेब, ज्ञानेश्वर वाघमोडे यांच्यासह ग्रामस्थ,विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी देशमुख सर यांनी केले. मुख्याध्यापक गुंडीबा कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.












Add Comment