Maharashtra सोलापूर जिल्हा

पंढरपूर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण,आणीबाणीतील नागरिकांचा सन्मान

स्वातंत्र्य दिनाच्या या शासकीय कार्यक्रमातून राष्ट्रध्वजाप्रती सन्मान, सामाजिक जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व केले अधोरेखित

पंढरपूर तहसील कार्यालयात ८० व्या स्वातंत्र्य दिना निमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणीबाणीतील नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१५ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूर तहसील कार्यालयात राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सभापती शुभम आगवणे, सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, वैभव बुचके, डी.एस. आसवले यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थितांना जलसंधारण सप्ताहाच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण तसेच पॉश कायद्याबाबत ध्वज प्रतिज्ञा देण्यात आली.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आणीबाणीच्या काळात बंदीवास सोसावा लागलेल्या पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी सचिन इथापे आणि सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या हस्ते संबंधित नागरिकांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाच्या या शासकीय कार्यक्रमातून राष्ट्रध्वजाप्रती सन्मान, सामाजिक जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

पंढरपूर तहसील कार्यालयात ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणीबाणीतील नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.