पंढरपूरच्या महावस्त्र महासेलला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; 300 भाविकांनी केली खरेदी,₹ 3.52 लाखांचे उत्पन्न
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या महावस्त्र महासेलला पहिल्याच दिवशी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 300 भाविकांनी खरेदी केली; मंदिर समितीला ₹3.52 लाखांचे उत्पन्न
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19 : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती च्यावतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्रांचा महासेल श्री संत तुकाराम भवन येथे सुरू असून, पहिल्याच दिवशी भाविक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आज सुमारे 300 भाविक व नागरिकांनी महासेलला भेट देत महावस्त्रांची खरेदी केली. या विक्रीतून मंदिर समितीस ₹3 लाख 52 हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.
महावस्त्रांना धार्मिक व भावनिक महत्त्व असल्याने ती प्रसाद स्वरूपात आपल्या घरी नेण्यासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. हा महासेल दि. 24 ऑगस्ट 2026 पर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार असून, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी केले.














Add Comment