अकलूज पोलिसांची धडक कारवाई: १८ लाखांच्या मुद्देमालासह १७ देशी पिस्तूल आणि ४७ जिवंत काडतुसे जप्त; ६ आरोपींना अटक
अकलूज पोलिसांचा आंतरराज्यीय अवैध शस्त्र तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक; मध्य प्रदेश-सांगली कनेक्शन उघड, १७ अग्निशस्त्रे जप्त
सोलापूर ग्रामीणच्या अकलूज पोलिसांनी मोठी कारवाई करत १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि नेक्सॉन कारसह सुमारे १८.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मध्य प्रदेशातून होणारी शस्त्रांची तस्करी उघडकीस आणत ६ आरोपींना बेड्या ठोकल्या
सोलापूर| ज्ञानप्रवाह न्यूज :सोलापूर ग्रामीण अंतर्गत अकलूज पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध अग्निशस्त्रां विरोधात मोठी मोहीम राबवून एका आंतरराज्यीय शस्त्र तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी तब्बल १७ देशी बनावटीची पिस्तुले (अग्निशस्त्रे), ४७ जिवंत काडतुसे (राऊंड) आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा नेक्सॉन कार (MH 45 AF 7002) असा एकूण १८,५४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ६ आरोपींना अटक केली आहे.
अशी झाली कारवाई:
दि.१४ ऑगस्ट रोजी अकलूज पोलीस ठाण्याचे पोहेकॉ श्रीराम पोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,विकास कैलास वजाळे वय ३१ रा.परीते ता. माढा हा नेक्सॉन कारमधून बेकायदेशीर देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी अकलूज ते टेंभुर्णी रोडवरील पतंगे मटण हॉटेल संगम ता.माळशिरस येथे येणार आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून विकास वजाळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ पिस्तुले, ४ जिवंत काडतुसे आणि कार जप्त करण्यात आली.

मध्य प्रदेश व सांगली कनेक्शन उघड:
अटक आरोपी विकास वजाळे याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा शस्त्रसाठा राहुल सतीश माने रा.मिरज,जि.सांगली याच्या मदतीने अनिल पंचलाल मेहता रा.रांजनगाव ता.वरला,जि. बडवाणी, मध्य प्रदेश याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले.
अकलूज पोलिसांच्या पथकाने तातडीने सोनगीर जि.धुळे येथे जाऊन सापळा रचला व मध्य प्रदेशातील आरोपी अनिल पंचलाल मेहता याला ताब्यात घेतले. त्याच्या कडून ४ पिस्तुले व २५ जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर आरोपी राहुल सतीश माने यालाही मिरज येथून ताब्यात घेऊन त्याच्या कडून ६ पिस्तुले आणि ८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
इतर साथीदारांवर छापे व जप्ती:
आरोपींनी ही पिस्तुले इतर लोकांना विक्री केल्याचे सांगितल्यावरून पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून उर्वरित शस्त्रे जप्त केली.

महादेव बाळासाहेब कोरके (रा. करकंब,ता.पंढरपूर) – १ पिस्तूल, २ काडतुसे
विजय सदाशिव किरणगी रा. शिवपूर, ता.आटणी, जि.बेळगाव, कर्नाटक – १ पिस्तूल, २ काडतुसे
सुमित नाना लवटे रा.सांगोला – १ पिस्तूल, २ काडतुसे
प्रदिप माने रा.चिकमहूद,ता. सांगोला व शनि बनसोडे रा. अकोले खुर्द,ता.माढा यांच्या घरांची झडती घेऊन प्रत्येकी १ पिस्तूल व २ काडतुसे हस्तगत करण्यात आली.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१. विकास कैलास वजाळे वय ३१, रा.परीते, ता.माढा,२. राहुल सतीश माने वय ३४,रा. मिरज,जि.सांगली,
३. महादेव बाळासाहेब कोरके वय ३०, रा.करकंब,ता.पंढरपूर,४. विजय सदाशिव किरणगी वय ३४, रा.आटणी,जि.बेळगाव,कर्नाटक,
५. अनिल पंचलाल मेहता वय ३२, रा. जि.बडवाणी मध्य प्रदेश,६. सुमित नाना लवटे वय १९, रा. सांगोला, जि. सोलापूर तर प्रदिप पांडुरंग माने व शनि भारत बनसोडे हे दोघे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक आरोपींना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कारवाई पथक:
सदरची धडक कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, श्रीमती प्रेरणा कट्टे अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पंढरपुर विभाग तसेच संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण उबाळे , सहा.पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे ,सहा. पोलीस निरीक्षक अकुंश वाघमोडे ,पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम अकलुज पोलीस ठाणे,पोहेकॉ/१६२६ श्रीराम दिनेश पोरे, पोहेकों / १५८९ शिवकुमार रेवाप्पा मदभावी, पोहेकों/२११ राहुल सुग्रीव रणनवरे, पोहेकॉ/९७८ अमोल मोहण बकाल, पोहेकों / १४०७ समीर लतीफ पठाण, पोना/११७७ दत्तात्रय पांडुरंग खरात, पोकॉ/५१ रणजित राजेंद्र जगताप, पोकॉ/७११ तुकाराम शिवाजी माने देशमुख, पोकॉ/८७५ विजय शशिकांत तवटे त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे पथकातील सपोफौ शरद कदम, पोहेकॉ/३९६ सुरज हेंबाडे,पोहेकॉ/१६५९ अनिल महादेव शिंदे,पोहेकॉ/११४ स्वप्नील गायकवाड,पोकों प्रविण मेटकरी सायबर पोलीस ठाणे व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.












Add Comment