Maharashtra crimes सोलापूर जिल्हा

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;करमाळा उपविभागातील १७ अट्टल गुन्हेगार हद्दपार

करमाळा उपविभागातून मुन्ना दैनसह १७ अट्टल गुन्हेगार हद्दपार; पोलिसांची कारवाई

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; करमाळा उपविभागातील करमाळा,टेंभुर्णी व कुर्डूवाडी हद्दीतील १७ अट्टल गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;करमाळा उपविभागातील १७ अट्टल गुन्हेगार हद्दपार

करमाळा, टेंभुर्णी, कुर्डूवाडीत पोलिसांचा दणका; १७ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

करमाळा | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ ऑगस्ट २०२६ : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वाळू तस्करी, शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे तसेच अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारां विरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे.करमाळा उपविभागा तील करमाळा, टेंभुर्णी आणि कुर्डूवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या १७ अट्टल गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरीरा विरुद्ध तसेच मालमत्ते विरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.

त्यानुसार करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्हि.एस.सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी करमाळा, टेंभुर्णी आणि कुर्डूवाडी या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी तसेच परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार केली. संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केले.

माढा विभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी जयश्री आव्हाड यांनी करमाळा उपविभागातील तब्बल १७ गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.या कारवाईमुळे करमाळा उपविभागा तील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यास मदत होणार असून परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये जयवर्धन ऊर्फ मुन्ना हनुमंत दैन रा. वांगी ता.करमाळा; ओंकार दत्तात्रय गव्हाणे रा. कुर्डूवाडी; नागेश शंकर लोंढे रा. टेंभुर्णी;करण कृष्णा आलाट रा. मोलाली माळ करमाळा; मारुती जनार्दन केचे, रा.आलेगाव खुर्द; आगतराव लक्ष्मण काळे, रा. अकोले खुर्द; हनुमंत बापू महाडिक रा. मुंगशी; धिरज अशोक जाडकर, रा.मोडनिंब; बप्पा ऊर्फ शिवानंद मेघराज भोसले रा.बेंबळे; महेश उत्तरेश्वर गायकवाड रा.शेवरे; संजय हरिदास दरगुडे रा. चौभेपिंपरी; अजित नवनाथ पाटोळे रा.शेवरे; विकास रमेश काळे रा.चौभेपिंपरी; समाधान कल्याण जरक रा. टाकळी; रत्नमाला आगतराव काळे, रा.अकोले खुर्द; विमल आगतराव काळे रा.अकोले खुर्द आणि चेतन आण्णा काळे रा.बेंबळे यांचा समावेश आहे.

सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध सतत वाढत असलेली गुन्हेगारी, अवैध धंदे आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या इसमांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्हि.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलिसांनी कारवाईसाठी विशेष प्रयत्न केले.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.