Maharashtra सोलापूर जिल्हा

महसुली प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित? पंढरपूरमध्ये लोक अदालत अभियान,जाणून घ्या अर्ज व निपटाऱ्याचे टप्पे

पंढरपूर उपविभागात प्रलंबित महसुली दावे व अपिले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार. १ सप्टेंबर २०२६ ते १० मार्च २०२७ दरम्यान विविध टप्प्यांत प्रकरणांचा होणार निपटारा 

पंढरपूरमध्ये महात्मा फुले महसूल लोक अदालत अभियान; प्रलंबित महसुली दावे-अपिले तडजोडीने निकाली काढणार

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि,०१ सप्टेंबर २०२६ : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय व हक्क पोहोचविणे या त्यांच्या विचारांच्या मूळ सूत्राच्या अनुषंगाने महसूल विभागांतर्गत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर सहमतीने आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी पंढरपूर उपविभागात महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

या अभियानात मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी,अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांचा आणि अपिलांचा समावेश असेल.


पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पंढरपूर तालुक्यात 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत प्रसिध्दी व जनजागृती मोहिम, प्रकरणांचे वर्गीकरण तसेच सहमतीने पहिल्या टप्प्यातील दाव्यांचा कायमस्वरुपी निपटारा करण्यात येणार आहे.1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत प्रलंबीत अपिलांचा आढावा घेवून पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने तहसील व उपविभागीय स्तरावरील गुंतागुंतीच्या महसुली दाव्यांमध्ये तडजोड करण्यात येणार आहे. तर 01 फेब्रुवारी ते 10 मार्च कालावधीत उर्वरित सर्व शक्य दाव्यांच्या अंतिम निपटारा करण्यात येणार आहे. दि. 17 आक्टेंबर 2026 व 9 जानेवारी 2027 तर 20 मार्च 2027 रोजी प्रत्यक्ष लोकअदालतीत उपविभागीय अधिकारी स्तरावरील केसेस उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल स्तरावरील केसेस तहसिलदार कार्यालयात होणार आहेत.तसेच मोहोळ तालुक्यात पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकआदलत 16 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.

महसूल विभागांतर्गत अर्धन्यायिक प्रकरणे प्रलंबित असलेल्यांनी या लोक अदालतीचा लाभ घेऊन तडजोडीने प्रकरण निकाली काढण्यासाठी संबंधिताकडे अर्ज करावेत,असे आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.