Maharashtra सामाजिक

१५ वर्षांच्या संघर्षाला यशाची किनार! रोहित कलढोणे यांची जीएसटी अधिकारीपदी निवड; म्हसवडमध्ये सत्कार

१५ वर्षांच्या संघर्षाला यशाची किनार! रोहित कलढोणे यांची जीएसटी अधिकारीपदी निवड; म्हसवडमध्ये सत्कार

जिद्द,चिकाटी आणि संयमाचे फळ; जीएसटी अधिकारी रोहित कलढोणे यांचा म्हसवडमध्ये गौरव

म्हसवड येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद रोहित नंदकुमार कलढोणे यांची जीएसटी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांच्या संघर्ष,जिद्द आणि यशाचे उपस्थितांनी कौतुक केले

म्हसवड | ज्ञानप्रवाह न्यूज : म्हसवड ता.माण येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेत जीएसटी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल रोहित नंदकुमार कलढोणे यांचा म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, म्हसवड नगरपरिषद आरोग्य सभापती विजय बनगर,नगरसेवक महावीर विरकर तसेच ज्येष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्कार प्रसंगी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण म्हणाले की,रोहित कलढोणे यांच्या काही संधी दुर्दैवाने हुकल्या मात्र त्यांनी निराश न होता सातत्याने राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचा प्रयत्न सुरू ठेवला. तब्बल १५ वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी यश मिळविले.आजच्या तरुण पिढीने त्यांच्या जिद्द,चिकाटी आणि संयमाचा आदर्श घ्यावा.

पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी सांगितले की,एखाद्या परीक्षेत किंवा प्रयत्नात अपयश आले की आजच्या पिढीतील काही तरुण नैराश्याला बळी पडतात मात्र रोहित कलढोणे यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा संदेश त्यांच्या यशातून मिळतो.

ज्येष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे म्हणाले की, अहिंसा पतसंस्थेने गेल्या २५ वर्षांपासून समाजातील उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेत संबंधितांचा सन्मान करण्याची परंपरा जपली आहे.रोहित कलढोणे यांचे कुटुंब अध्यात्मिक संस्कारांचे असून, वडिलांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांच्या साथीने त्यांनी हे यश संपादन केले आहे.

नगरसेवक महावीर विरकर यांनी रोहित कलढोणे यांच्या यशाचे कौतुक करताना म्हसवडच्या वैभवात त्यांच्या यशाने भर पडली असून त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले.

अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितीन दोशी म्हणाले की, रोहित कलढोणे यांनी गेली १५ वर्षे न थकता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व प्रयत्न सुरू ठेवले.अनेकदा संधी हुकल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही त्यामुळे त्यांच्या आजच्या यशामागे संघर्ष, जिद्द आणि चिकाटीची किनार आहे.जीएसटी अधिकारी म्हणून देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी त्यांना मिळाली असून, ही बाब अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी संस्थेचे संचालक महावीर व्होरा,सुजय दोशी, नंदकुमार कलढोणे,सागर वेदपाठक,सागर पोरे,अझहर मुजावर,पप्पू बाबर, राजू शहा यांच्यासह अहिंसा पतसंस्थेचे अधिकारी-कर्मचारी आणि म्हसवडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले.रोहित कलढोणे यांच्या यशामुळे म्हसवड परिसरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणा मिळाली असून, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर ध्येय साध्य करता येते, हा संदेश या सत्कार सोहळ्यातून देण्यात आला.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.