Maharashtra Politics

पुणे शिक्षक मतदारसंघा साठी मंगेश चिवटे यांचा भेटीगाठींना वेग; संभाजी नाना होळकरांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटे यांचा भेटीगाठींना वेग; संभाजी नाना होळकरांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी संभाजी नाना होळकर यांची सदिच्छा भेट घेतली. शिक्षकांच्या प्रश्नांवरील कामाची माहिती देत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला

शिक्षकदूत मंगेश चिवटे यांना संभाजी नाना होळकरांचा पाठिंबा ? पुण्यात सदिच्छा भेटीत सकारात्मक संवाद

पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ ऑगस्ट २०२६ : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच पुणे DCC बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संभाजी नाना होळकर यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी पंचायत समिती सभापती युवराज नाना काकडे उपस्थित होते.

या भेटीदरम्यान मंगेश चिवटे यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. शिक्षकांच्या समस्या सोडविण्या साठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती असलेल्या परिचय पत्रकांचे यावेळी वाटप करण्यात आले.

शिक्षकदूत म्हणून शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या कामांची माहिती उपस्थित शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचविण्यात आली. शिक्षकांच्या विविध अडचणी, हक्क आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांवर सातत्याने काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे चिवटे यांनी यावेळी सांगितले.

या संवादादरम्यान संभाजी नाना होळकर यांनी मंगेश चिवटे यांच्या कामाबाबत सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी चिवटे यांचा सुरू असलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मंगेश चिवटे सदैव कटिबद्ध असून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील काळातही सातत्याने काम सुरू ठेवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान संभाजी नाना होळकर यांनी दाखविलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर चिवटे यांच्या भेटीगाठींना वेग आला असून शिक्षकांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.