Maharashtra

श्रावणी निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविले

श्रावणी निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

श्रावणी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपरिक सुवर्ण अलंकार; मनोहारी रूपाने भाविकांचे लक्ष वेधले

पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ ऑगस्ट २०२६ : श्रावणी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक, मनोहारी व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. पारंपरिक अलंकारांनी सजलेले श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत असून, त्यांचे रूप अधिक विलोभनीय दिसून आले.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठया जोड मोठा, हिऱ्याचे कंगन जोड, बालाजी नाम, मोत्याचे तुरा, मोत्याची कंठी दोन पदरी, मोत्याची कंठी एक पदरी, शिरपेच लहान दहा लोक असलेला, शिरपेच मोठा दहा लोक असलेला, मत्स्य जोड, तोडे जोड, पुतळ्यांची माळ, जाणवे, तुळशीची माळ एक पदरी आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.

तसेच रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, ताणवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी व कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.

श्रावणी निमित्त करण्यात आलेल्या या पारंपरिक अलंकारांच्या सजावटीमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मनोहारी रूप भाविकांना अनुभवता आले.याबाबतची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.