कामाठीपुऱ्यातील महिलांचं दुःख जाणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी साजरे केले रक्षाबंधन
कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रामदास आठवलेंनी साजरे केले रक्षाबंधन; पुनर्वसन आणि रोजगारासाठी प्रयत्नांची ग्वाही
महिलांनी बांधली रामदास आठवलेंना राखी; कामाठीपुऱ्यातील महिलांच्या दुःखाला जाणून घेत पुनर्वसनाचा निर्धार
मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ ऑगस्ट : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी रक्षाबंधनानिमित्त मुंबईतील कामाठीपुऱ्यात जाऊन तेथील महिलांसोबत रक्षाबंधन साजरे केले.महिलांनी ना.रामदास आठवले यांच्या हातावर राखी बांधली.यावेळी त्यांनी कामाठीपुऱ्यातील महिलांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या दुःखाशी संवाद साधला.
कामाठीपुऱ्यातील महिलांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या समस्या सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्रा सह कर्नाटक,आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या विविध राज्यांमधून महिला येथे येतात. उदरनिर्वाहासाठी त्यांना येथेच राहावे लागते. आज त्यांच्या हस्ते राखी बांधून घेण्याचा मला बहुमान मिळाला, असे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.
त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही ना.आठवले यांनी स्पष्ट केले. पुनर्वसनासोबतच महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे आठवले यांनी सांगितले.महिलांचे पुनर्वसन, रोजगारनिर्मिती आणि सुरक्षित वातावरण यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.












Add Comment