मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस म्हसवडमध्ये उत्साहात; वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
म्हसवड नगरपरिषदेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा; सौ सोनिया जयकुमार गोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसवड नगर परिषदेच्यावतीने भाजपा नेत्या सोनिया गोरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गीत सादर करून शुभेच्छा दिल्या.
म्हसवड | ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त म्हसवड नगरपरिषदे च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी व भाजपा नेत्या सौ. सोनिया गोरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी अहिल्यादेवी उद्याना लगतच्या परिसरात सौ.सोनिया गोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जि. प.शाळा क्रमांक ३ म्हसवड येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे संदेश देणारे फलक हातात घेऊन टाळ्यांच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त सामूहिक गीत सादर करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सौ.सोनिया गोरे यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास म्हसवड नगरपरिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सभापती, सर्व नगरसेवक, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, भाजपा मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड, मुख्याधिकारी डॉ.सचिन माने, नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण,स्वच्छतेचा संदेश आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.












Add Comment