विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आक्रमक; स्पर्धा परीक्षा कायम ऑफलाइन घेण्याची मागणी
पंढरपूर : NTA विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे तहसील कार्यालयासमोर निवेदन, पेपरफुटी रोखण्यासाठी ठोस कारवाईची मागणी
पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी, NTA ची जबाबदारी निश्चित करणे आणि महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा कायम ऑफलाइन पद्धतीने घेण्याच्या मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन दिले.
पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ जुलै २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने विद्यार्थी आणि युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात २० जुलै रोजी पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात स्पर्धा परीक्षांचे वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार तातडीने थांबवावेत, महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत तसेच NTA (National Testing Agency) संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.हे निवेदन तहसीलदार सचिन लंगुटे यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख,पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद देशमुख, प्रदेश प्रवक्ते प्रा.महादेव तळेकर, शहराध्यक्ष दिपक वाडदेकर, पंचायत समिती सदस्या सायली गायकवाड, संतोष पवार, सुधीर भोसले तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











Add Comment