पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील कोहिनुर हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
शून्यातून विश्व उभारणारे शिक्षण महर्षी’; डॉ.डी.वाय. पाटील यांच्या निधनावर रामदास आठवले यांची शोकभावना
पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करत ‘शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर हरपला’ अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.04 – पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आहे. त्यांनी शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपले फार मोठे योगदान दिले आहे.शुन्यातुन विश्व निर्माण करुन जगाला आदर्श वाटावा असे कर्तृत्व त्यांनी उभारले आहे.शिक्षण क्षेत्रातील त्यांची कामगिरी ही जागतिक पातळीवर गौरवणारी असुन त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राचा कोहिनुर हरपला आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत डॉ. डी.वाय.पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.
कोल्हापुरच्या महापौरपदापासुन आपल्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनाला सुरुवात करणारे डॉ.डी.वाय.पाटील हे श्रेष्ठ शिक्षणतज्ञ होते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीने ते शिक्षण महर्षी ठरले आहेत. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराबद्दल त्यांना प्रचंड श्रध्दा होती.आंबेडकरी चळवळीबद्दल त्यांना प्रचंड प्रेम आणि सहानुभूती होती.दलितांचे ते मित्र होते.त्यांनी अनेक दलित मुलांना शिक्षणासाठी मोठी मदत केली असे ना.रामदास आठवले म्हणाले.
मला अनेक विद्यापीठांनी डॉक्टरेट होण्याची ऑफर केली परंतु मी कोणत्याही विद्यापीठाची डॉक्टरेट स्विकारली नाही. जेव्हा मला डॉ.डी.वाय.पाटील यांनी आग्रह केला तेव्हा मी त्यांच्या आग्रहाला होकार दिला.डॉ.डी.वाय.पाटील यांनी मला डॉक्टरेट देवून नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये माझा सत्कार केल्याची मला आठवण आहे.डॉ.डी.वाय.पाटील हे कोल्हापुरचे महापौर,विधानसभे मध्ये आमदार,त्रिपुरा,पश्चिम बंगाल आदी राज्यांचे ते राज्यपालही राहिले आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड आदर्शवत काम केले आहे त्यांचा आम्हाला अभिमान होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची आणि देशाची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी हानी झालेली आहे ती हानी कधीही भरुन निघणार नाही, अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.












Add Comment