माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित संवादवारी ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २३: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित संवादवारी ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे,सर्वश्री आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, उत्तम जानकर, नारायण पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी हे विशेष दालन उभारण्यात आले आहे. ‘संवादवारी’ या उपक्रमातून शासन-जनता संवाद अधिक प्रभावी करण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण, कौशल्य विकास व गुंतवणूक, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नवीन शैक्षणिक धोरण २०२०, कृषी विभागाचे डिजिटल उपक्रम, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, महात्मा फुले जनआरोग्य योजना, कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, मागेल त्याला शेततळे, लेक लाडकी योजना, पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना, आश्रम शाळा सुविधा, हरित ऊर्जा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र गृहनिर्माण योजना, दिव्यांग धोरण, शाश्वत जलसंपदा व्यवस्थापन व विकास, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र रोजगार हमी योजना आदी योजनांबाबत आकर्षक एलईडी चित्ररथ, पथनाट्य व प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

आषाढी वारी 2026: पंढरपुरात ‘संवादवारी’ विशेष दालन सुरू, एलईडी चित्ररथ व प्रदर्शनातून शेतकरी, महिला आणि युवकांसाठी योजनांची माहिती
पंढरपूर आषाढी वारी 2026 निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवादवारी ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. शेतकरी,महिला, युवक, आरोग्य,कृषी,शिक्षण,रोजगारासह विविध शासकीय योजनांची माहिती एलईडी चित्ररथ,पथनाट्य आणि प्रदर्शनाद्वारे उपलब्ध.











Add Comment