Maharashtra Politics

पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; आमदार सत्यजीत तांबे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; आमदार सत्यजीत तांबे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महान शिक्षणमहर्षी हरपले : पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांच्या निधनावर आमदार सत्यजीत तांबे यांची शोकभावना

पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांच्या निधनाबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना शिक्षण क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्व म्हटले. राज्यपाल, शिक्षणमहर्षी आणि समाजसेवक म्हणून त्यांच्या योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली.

संगमनेर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ ऑगस्ट २०२६ : सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.

डॉ.डी.वाय.पाटील साहेब हे माझ्यावर नेहमीच प्रेम करणारे, जिव्हाळ्याने मार्गदर्शन करणारे दिलदार स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या साधेपणाने,आपुलकीने आणि माणुसकीने अनेकांना प्रेरणा दिली.त्यांच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे,असे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

शिक्षणमहर्षी डॉ.डी वाय पाटील यांनी बिहार,त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत महाराष्ट्राचा गौरव वाढवला. तसेच शिक्षण क्षेत्रात अनेक दर्जेदार शैक्षणिक संस्था उभारून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली.

त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील एक मोठे मार्गदर्शक आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. या दुःखाच्याप्रसंगी मी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.