Maharashtra आषाढी वारी

वीर धरणातून २५ हजार क्युसेक विसर्ग;पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची पाणीपातळी वाढणार, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

वीर धरणातून २५ हजार क्युसेक विसर्ग; पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची पाणीपातळी वाढणार, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

आषाढी वारीदरम्यान मोठा अलर्ट! चंद्रभागेत पाणी वाढणार; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २५: नीरा नदीच्या पात्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वीर धरण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आज दि. २५ जुलै २०२६ रोजी दुपारी २.०० वाजल्यानंतर पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

वीर धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले असल्याने अतिरिक्त पाण्याचा साठा करणे शक्य नाही. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दि. २२ जुलै २०२६ रोजी ४६०० क्युसेकने सुरू झालेला विसर्ग दि. २४ जुलै २०२६ पासून १५ हजार क्युसेक करण्यात आला असून तो आता २५ हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पाण्याचा निचरा नीरा नदीमार्गे भीमा नदीत होत असून त्याचा थेट परिणाम चंद्रभागेच्या पातळीवर होणार आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपूर शहरातील भाविक-वारकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज दुपारी २ नंतर पाणीपातळीत सातत्याने वाढ होणार असल्याने कोणत्याही नागरिकाने नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन अधीक्षक अभियंता, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण (पाटबंधारे विभाग) सोलापूर यांनी केले आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागा किनारी आणि वाळवंटात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.