Maharashtra आषाढी वारी

मासाळवाडी ते म्हसवड विद्यार्थ्यांची पायी वारी; नितीन दोशी यांच्या हस्ते वारकऱ्यांचे स्वागत

आषाढी वारीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये; माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या पायी वारीचे म्हसवडमध्ये उत्स्फूर्त स्वागत

मासाळवाडी ते म्हसवड विद्यार्थ्यांची पायी वारी; नितीन दोशी यांच्या हस्ते वारकऱ्यांचे स्वागत

आषाढी वारीचे औचित्य साधत माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल, मासाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी म्हसवडपर्यंत पायी वारी काढली. अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दोशी यांच्या हस्ते वारकरी विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.

म्हसवड | ज्ञानप्रवाह न्यूज, दि. २२ जुलै : आषाढी वारीचे औचित्य साधत माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मासाळवाडी यांच्या वतीने विद्यार्थ्यांची पायी वारी उत्साहात काढण्यात आली.म्हसवड शहरात दाखल झालेल्या या वारीचे म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दोशी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी वारकरी परंपरेचे प्रतीक म्हणून मान्यवरांना वारकरी स्कार्फ व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संत विचार आणि सामाजिक संस्कार रुजविण्याचा संदेश देण्यात आला.

याप्रसंगी माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्वेसर्वा डॉ.वसंत मासाळ, सौ.सविता मासाळ नगरसेविका व प्राचार्या,रावसाहेब मासाळ सर, नूतन नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली धनाजी शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास अहिंसा परिवाराचे सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या पायी वारीने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.