म्हसवडमध्ये स्व.अजित दादा पवार यांची जयंती साजरी; युवराज काका सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
अहिंसा पतसंस्थेत स्व.अजित दादा पवार यांना अभिवादन; नितीन दोशींसह मान्यवरांची उपस्थिती
म्हसवड येथील अहिंसा पतसंस्थे मध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य प्रतोद नगरसेवक युवराज काका सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
म्हसवड जि.सातारा | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ जुलै : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त म्हसवड ता. माण येथील अहिंसा पतसंस्थेमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी म्हसवड नगरपरिषदेचे मुख्य प्रतोद तथा नगरसेवक युवराज काका सूर्यवंशी यांच्या हस्ते स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाला आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात स्व.अजित दादा पवार यांच्या कार्याची आठवण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.











Add Comment