Maharashtra आषाढी वारी

आषाढी वारीत भारत स्काऊट्स अँड गाईड्सची स्वच्छता सेवा; 852 स्काऊट-गाईड व 92 शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

आषाढी वारीत भारत स्काऊट्स अँड गाईड्सची स्वच्छता सेवा; 852 स्काऊट-गाईड व 92 शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

पंढरपूर वारीत स्वच्छतेचा आदर्श! 944 स्वयंसेवकांनी राबवला भव्य स्वच्छता सेवा प्रकल्प

पंढरपूर आषाढी वारी 2026 निमित्त सोलापूर भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या वतीने स्वच्छता सेवा प्रकल्प राबविण्यात आला. 852 स्काऊट-गाईड विद्यार्थी आणि 92 शिक्षकांनी स्वच्छता अभियानात सहभागी होत सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला.

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 29 जुलै : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर भारत स्काऊट्स अँड गाईड्स जिल्हा कार्यालय यांच्या वतीने सन 2026-27 चा आषाढी वारी स्वच्छता सेवा प्रकल्प उत्साहात आणि यशस्वीपणे राबविण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हा मुख्य आयुक्त कादर शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तथा जिल्हा आयुक्त स्काऊट सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हा आयुक्त गाईड रूपाली भावसार, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) तथा जिल्हा चिटणीस विठ्ठल ढेपे, लेखाधिकारी समग्र शिक्षा अभियान तथा जिल्हा कोषाध्यक्ष राहुल सलगर, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट शंकर यादव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड सुलक्षणा लोखंडे, जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे, जिल्हा संघटक गाईड अनुसया सिरसाठ आणि जिल्हा आयुक्त रोव्हर रशीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

दि. 28 जुलै 2026 रोजी आयोजित या स्वच्छता सेवा प्रकल्पाचे उद्घाटन पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि पंढरपूर गटशिक्षणाधिकारी रणदिवे यांच्या हस्ते स्वच्छता रॅलीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

या अभियानात सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, करकंब, सांगोला, मंगळवेढा परिसरातील विविध शाळांमधील 852 स्काऊट व गाईड विद्यार्थी तसेच 92 शिक्षक-शिक्षिका, असे एकूण 944 स्वयंसेवक सहभागी झाले. वारकरी मार्ग, मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनाचा तसेच सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देण्यात आला.

स्वच्छता सेवा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी महादेव पुजारी, यंपे, समाधान बेद्रे, महेश भोसले, बाळासाहेब शिंगाडे आणि अशपाक मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले.

आषाढी वारीसारख्या भव्य धार्मिक सोहळ्यात भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या स्वयंसेवकांनी केलेल्या या सेवाकार्याचे उपस्थित मान्यवरांसह वारकरी भाविकांनीही कौतुक केले.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.