चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सवात आचार्य 108 श्री डॉ. प्रणामसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत पावन ग्रंथ भक्तामर के चमत्कार पुस्तकाचे प्रकाशन
पुण्यात घर घर भक्तामर,हर घर भक्तामर चा संकल्प; आचार्य डॉ प्रणामसागरजी महाराजांच्या उपस्थितीत ‘भक्तामर के चमत्कार’ पुस्तकाचे प्रकाशन
पुण्यात चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सवात ‘घर घर भक्तामर, हर घर भक्तामर’चा संकल्प करण्यात आला.आचार्य प्रणामसागरजी महाराजांच्या उपस्थितीत ‘भक्तामर के चमत्कार’ पुस्तकाचे प्रकाशन.
पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,१० ऑगस्ट २०२६ : परमपूज्य डॉ.अभिनव मानतुंगाचार्य आणि ज्योतिषी डॉ. 108 श्री प्रणामसागरजी महाराज (भक्तामर वाले बाबा) यांच्या उपस्थितीत भक्तामरमय चातुर्मास – पुणे 2026 अंतर्गत चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सव भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.गंगाधाम कोंढवा पुणे येथील नजुश्री भवन येथे रविवारी 9 ऑगस्ट रोजी झालेल्या या धार्मिक सोहळ्याला जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आचार्यश्री लिखित भक्तामर के चमत्कार (मिरॅकल्स ऑफ भक्तामर) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
रविवारी 9 ऑगस्ट रोजी झालेल्या या चातुर्मास सोहळ्याला शोभा धारीवाल,अरविंद जैन,विलास राठोड,अचल जैन, बाळासाहेब धोका,चकोर गांधी,डॉ.कल्याण गंगवाल,अक्षय जैन,दिलीप मेहता आदी उपस्थित होते.
भक्तामार प्रभावना चातुर्मास समितीच्या स्वप्नील पाटणी, मिलिंद फडे,विनय चुरीवाला,शीतल लोहाडे, मनीष जैन, डॉ.रवींद्र गांधी,संतोष नवाळे,अनुप शहा,राजेश सेठी, हितेश गांधी,सारंग शहा,वीरेंद्र शहा, हेमंत जैन, विनय जैन, अनिल जैन, अनिल पाटील आदींचा समावेश होता.सकल जैन समाज पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कासलीवाल, अमित कासलीवाल,सतीश अजमेरा,प्रकाश गंगवाल,चित्रेश नरपटत्या यांनी आयोजन केले.

यावेळी उपस्थित भाविकांनी घर घर भक्तामर, हर घर भक्तामर अंतर्गत प्रत्येक घरात आध्यात्मिक मूल्ये, सकारात्मकता आणि धार्मिक भावनांचा प्रसार करण्यासाठी भक्तामर स्तोत्राचे पठण करण्याचा संकल्प केला.चातुर्मास हा आत्मपरीक्षण,ध्यान,संयम आणि धार्मिक उपासनेसाठी एक पवित्र काळ असून या चातुर्मासात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या चातुर्मासातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये पुण्यातील संपूर्ण जैन समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांचे स्वागत स्वप्निल पटनी यांनी केले.मिलिंद फडे यांनी प्रास्ताविक केले.शीतल लोहाडे यांनी आभार मानले.












Add Comment