Editor Choice Maharashtra सामाजिक

जागतिक डास दिन: डेंग्यू, मलेरियापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव कसा कराल ?

जागतिक डास दिन: डेंग्यू, मलेरियापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव कसा कराल ? सोपे उपाय

सावधान!डासांमुळे होणारे जीवघेणे आजार कसे टाळायचे ? जागतिक डास दिनी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

२० ऑगस्ट रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘जागतिक डास दिना’चे महत्त्व, डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया रोखण्यासाठीचे प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीबद्दल सविस्तर माहिती

जागतिक डास दिन: जनजागृती, दक्षता आणि निरोगी भविष्याची गरज

पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज – दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जगभरात जागतिक डास दिन World Mosquito Day पाळला जातो. ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी १८९७ मध्ये याच दिवशी मादी अ‍ॅनोफिलीस डासांमुळे मानवामध्ये हिवताप (मलेरिया) पसरतो हा ऐतिहासिक शोध लावला होता. या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ आणि डासांमुळे होणाऱ्या घातक आजारांविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

लहान कीटक,मोठा धोका

आकाराने अत्यंत लहान असणारा डास हा जगातील सर्वात धोकादायक जीवांपैकी एक मानला जातो.डासांच्या विविध प्रजातींमुळे मलेरिया,डेंग्यू,चिकनगुनिया,झिका व्हायरस आणि फायलेरिया (हत्तीरोग) यांसारखे जीवघेणे आजार वेगाने पसरतात.भारतात दरवर्षी पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर डासांची पैदास वाढून डेंग्यू व हिवतापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसते.

डासांची उत्पत्ती कशी रोखाल ? प्रतिबंधात्मक उपाय

डासांमुळे होणारे आजार टाळण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे.यासाठी खालील गोष्टींचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे:

पाण्याचे साठे उघडे ठेवू नका:

घरातील पाण्याच्या टाक्या,ड्रम, भांडी घट्ट झाकून ठेवा.गच्चीवरील अथवा जमिनीवरील पाण्याच्या टाक्यांना अजिबात फट राहणार नाही याची खबरदारी घ्या.पाणी साठवण्याचे ड्रम किंवा भांडी दर २-३ दिवसांनी घासून स्वच्छ व कोरडी करा.

अनावश्यक पाणी साठू देऊ नका:

कुलर,फ्रिजचा मागील ट्रे,फुलदाण्या (फ्लॉवरपॉट्स),कुंड्यांच्या खालच्या प्लेट्समधील पाणी आठवड्यातून किमान एकदा पूर्णपणे रिकामे करून कोरडे करा.आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा.

परिसराची स्वच्छता:

घराभोवती पडलेली जुनी टायर्स, नारळाच्या करवंट्या,तुटलेली प्लास्टिकची भांडी,बाटल्या यांची योग्य विल्हेवाट लावा जेणेकरून पावसाचे पाणी त्यात साचणार नाही.

जैविक आणि रासायनिक नियंत्रण:

घरातील पाण्याचे हौद किंवा सिमेंटच्या टाक्यांमध्ये डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे सोडा.

सेप्टिक टँकच्या व्हेंट पाईपला वरच्या बाजूला नायलॉनची जाळी बसवा.

वैयक्तिक संरक्षण:

रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. डास प्रतिबंधक क्रीम्स (Repellents), लिक्विड किंवा कॉईल्सचा योग्य वापर करा.
खिडक्यांना जाळ्या बसवून संध्याकाळच्या वेळी डासांना घरात येण्यापासून रोखा आणि अंगाला पूर्ण झाकतील असे कपडे परिधान करा.

सामूहिक जबाबदारी हीच काळाची गरज

डासांचे नियंत्रण हे केवळ प्रशासनाचे किंवा आरोग्य विभागाचे काम नसून ही प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास डासांची पैदास होणार नाही आणि पर्यायाने डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियासारख्या आजारांना आळा बसेल.

या जागतिक डास दिनी आपल्या घरापासून आणि परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात करूया आणि डासमुक्त,निरोगी समाज घडवण्याचा संकल्प करूया.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.