विठ्ठल-रुक्मिणी भक्तांसाठी मोठी बातमी! तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन नोंदणी २६ ऑगस्टपासून सुरू
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तुळशी अर्चन पूजा; सप्टेंबर महिन्याची ऑनलाइन नोंदणी या तारखेपासून
पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेची सप्टेंबर २०२६ मधील ऑनलाइन नोंदणी २६ ऑगस्टपासून सुरू होणार. ₹२१०० देणगी मूल्य; अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंगची सुविधा

दि. ०१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ मधील पुजांची होणार नोंदणी
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२४ ऑगस्ट – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची तुळशी अर्चन पूजा मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत असून ०१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीतील तुळशी अर्चन पुजेची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात दि. २६ ऑगस्ट रोजी स.११.०० पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
या पूजेसाठी रुपये २१००/- इतके देणगी मूल्य आहे.०१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीतील गर्दीचे व सण- उत्सवाचे दिवस वगळून भाविकांना पूजा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समिती च्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल.याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी यावेळी सांगितले.












Add Comment