औसेकर महाराज परिवारावर मातृशोक;श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांना देवाज्ञा
श्रीक्षेत्र औसा संस्थानच्या चौथ्या पीठाधिपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या धर्मपत्नी व सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचे हैदराबाद येथे निधन
औसा | ज्ञानप्रवाह न्यूज : श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान, श्रीक्षेत्र औसा येथील चौथे पीठाधिपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या धर्मपत्नी तसेच विद्यमान पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचे शनिवार, दि.२२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ७.५० वाजता हैदराबाद येथील त्यांच्या आशीर्वाद निवासस्थानी निधन झाले.
श्रीमती लिलाबाई आईसाहेब यांच्या पार्थिवावर रविवार दि.२३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी औसा येथील पाराबाई येथे अंत्यसंस्कार झाले.
श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या पश्चात श्री गोरखनाथ महाराज,श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष श्री सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर आणि श्री बसवंतराव देशमुख चिडगोपा हे तीन सुपुत्र, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आईसाहेबांच्या निधनाने औसेकर महाराज परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, श्रीक्षेत्र औसा संस्थानच्या लाखो शिष्यांमध्येही शोककळा पसरली आहे. अध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील भाविकांनी आईसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत औसेकर महाराज परिवाराच्या दुःखात सहभागी होत आहेत.
भाविकांमध्ये शोककळा
श्रीमती लिलाबाई आईसाहेब यांच्या निधनाची वार्ता समजताच श्रीक्षेत्र औसा आणि संस्थानशी जोडलेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने औसेकर महाराज परिवारासोबतच संस्थानच्या असंख्य भक्तांवरही दुःखाची छाया पसरली आहे.











Add Comment