Maharashtra Politics

आमदार मुक्कामी आपल्या गावी उपक्रमांतर्गत आज आलेगाव खुर्द येथे आमदार अभिजीत आबा पाटील यांचा मुक्काम

आमदार मुक्कामी आपल्या गावी उपक्रमांतर्गत आज आलेगाव खुर्द येथे आमदार अभिजीत आबा पाटील यांचा मुक्काम

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांचा आमदार मुक्कामी आपल्या गावी उपक्रमांतर्गत आलेगाव खुर्द येथे मुक्काम. नागरिकांच्या समस्या व विकासकामांवर थेट संवाद साधला जाणार

माढा |पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २१ ऑगस्ट २०२६ -माढा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या आमदार मुक्कामी आपल्या गावी या उपक्रमांतर्गत आज आलेगाव खुर्द येथे सायंकाळी ६.०० वाजता आमदार अभिजीत पाटील यांचा मुक्काम आयोजीत करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या विविध समस्या,विकासकामे तसेच प्रलंबित प्रशासकीय प्रश्न जाणून घेऊन त्यावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात येणार आहे.

यावेळी गावातील महसूल,आरोग्य, पाणीपुरवठा,रस्ते, वीज,शिक्षण, महसूल, ग्रामविकास, शासकीय योजना व इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यां कडून माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना व पाठपुरावा करण्याच्या सूचना आमदार अभिजीत आबा पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

प्रशासन आपल्या दारी आणि आमदार आपल्या गावात या भावनेतून नागरिकांच्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, सर्व प्रशासकीय विभागांचा समन्वय साधून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

आलेगाव खुर्द परिसरातील नागरिकांनी आपल्या विविध समस्या व मागण्या घेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अभिजीत आबा पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.