Maharashtra Politics

अजितदादांच्या जयंतीला अनोखी आदरांजली! श्रीकांत शिंदेंकडून 50 विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटप

डिजिटल बोर्डऐवजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य! अजितदादांच्या जयंतीनिमित्त श्रीकांत शिंदेंचा सामाजिक उपक्रम

पंढरपुरात अजितदादांच्या जयंतीनिमित्त श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून आपटे उपलप हायस्कूलमधील 50 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप

अजितदादांच्या जयंतीला अनोखी आदरांजली! श्रीकांत शिंदेंकडून 50 विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटप

अजितदादांच्या वाढदिवसाऐवजी जयंती साजरी करण्याची दुर्दैवी वेळ कार्यकर्त्यांवर आली; सामाजिक उपक्रमांतून आठवणी जिवंत ठेवण्याचे आवाहन

पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज : लोकनेते अजितदादांचा वाढदिवस दरवर्षी 22 जुलै रोजी उत्साहात साजरा केला जातो. मात्र, त्यांच्या अपघाती निधनामुळे यंदा वाढदिवसा ऐवजी जयंती साजरी करण्याची दुर्दैवी वेळ राज्यातील कार्यकर्त्यांवर आली आहे, अशी भावना पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक ओंकार जोशी यांनी व्यक्त केली.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात मोठी लगबग असतानाही अजितदादांच्या सामाजिक कार्याच्या स्मृती जपण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी सामाजिक उपक्रम राबविला.आपटे उपलप हायस्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत 50 विद्यार्थी- विद्यार्थिनींना गणवेश तसेच वह्यांचे वाटप करण्यात आले.आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, तसेच गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

वाढदिवस एका दिवसाचा; पण सामाजिक कार्य वर्षभराचे

अजितदादांची जयंती केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी केली पाहिजे,अशी भूमिका श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे आणि गरजू घटकांना मदतीचा हात देणे हीच अजितदादांना खरी आदरांजली ठरेल,असेही त्यांनी सांगितले.

माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना नेत्याच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांचे डिजिटल बोर्ड लावण्याऐवजी सामान्य विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य देणे हा कार्यकर्त्यांसाठी आदर्श असल्याचे सांगितले. सामाजिक उपक्रमांतून अजितदादांच्या आठवणी जिवंत ठेवण्याचे काम पंढरपूरमध्ये होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये वृक्षारोपण,आरोग्य शिबिर,व्याख्यान आणि गुरुजनांचा सन्मान अशा विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असल्याची माहिती शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद यांनी दिली.

यावेळी नगरसेवक ओंकार जोशी, नगरसेवक विनायक संगीतराव, माजी नगरसेवक विक्रम शिरसट, माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद,कोळी समाजाचे नेते गणेश अंकुशराव, भाजपा युवा नेते राहुल परचंडे, बाराभाई तालीम संघाचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, युवक शहराध्यक्ष अमोल परबतराव, सारंग महामुनी,सोमनाथ अभंगराव, अमोल तारापूरकर यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.