Maharashtra Politics

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बेस्टमध्ये विविध उपाययोजनांची गरज आ.डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बेस्टमध्ये विविध उपाययोजनांची गरज आ.डॉ. नीलम गोऱ्हे

बेस्ट महिलांसाठी बेस्ट करणार : बेस्ट चेअरमन
तृष्णा विश्वासराव

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बेस्टमध्ये व्यापक कृती आराखडा; आ.डॉ. नीलम गोऱ्हे आणि बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ ऑगस्ट २०२६ : महिलांसाठी सुरक्षित,सर्वसमावेशक आणि लिंग-संवेदनशील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बेस्ट समितीच्या दालनात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत अक्षरा सेंटरच्या नंदिता शहा यांनी महिला सुरक्षेसंदर्भातील विविध उपाययोजनांचे सादरीकरण केले.

यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गेल्या दहा वर्षांतील महिला सुरक्षेसंदर्भातील बैठका,निर्णय आणि अनुभवांचा आढावा घेऊन त्याआधारे बेस्टसाठी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. बस प्रवासादरम्यान घडलेल्या घटनांचे विश्लेषण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक परिणामकारक करता येतील, असे त्यांनी सांगितले.कोविड काळात काही बेस्ट चालकांनी एकट्या महिला प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवून संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिल्याचा उल्लेख करत त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

महिला व मुलींसाठी दक्षता समित्या स्थापन करणे, महिला वाहकांच्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण,बसथांबे व निर्जन परिसरांमध्ये प्रकाशव्यवस्था वाढविणे, बस आगार व बसथांब्यांजवळ स्वच्छतागृहांची उभारणी, महिलांसाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप तक्रार व्यवस्था सुरू करणे, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणे, पुरुष सुरक्षा रक्षकांप्रमाणे महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अधोरेखित केले.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिके कडून बेस्ट उपक्रमासाठी आर्थिक मदत म्हणून ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या निधीमुळे विशेषतः निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी (उपदान) आणि इतर प्रलंबित देणी वेळेत अदा करण्यास मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सकारात्मक पुढाकाराबद्दल त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.तसेच बेस्टच्या आर्थिक व प्रशासकीय बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले.

बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून बसथांब्यांजवळ स्वच्छतागृहांची उभारणी, महिलांसाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप तक्रार व्यवस्था सुरू करणे आणि महिला सुरक्षेसाठी आवश्यक धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगितले.

अक्षरा सेंटरच्या नंदिता शहा यांनी पोस्टर मोहिमे द्वारे जनजागृती,चालक-वाहकांना लिंग- संवेदनशीलता प्रशिक्षण, सीसीटीव्ही यंत्रणा हेल्पलाईनशी जोडणे आणि नियमित लिंग सुरक्षा लेखापरीक्षण (Gender Safety Audit) राबविण्याची गरज अधोरेखित केली.

या बैठकीस सचिव सुदास सावंत, उपमहाव्यवस्थापक (अभियांत्रिकी) राजाराम करे, सहायक महाव्यवस्थापक (वाहतूक) आर. एम. मडावी,सहायक महाव्यवस्थापक (विधी) राजेंद्र डुबल,उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) अनुजा सुर्वे,मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्याम हेगडे तसेच बेस्टचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.