Maharashtra आषाढी वारी

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त निवडुंग्या विठ्ठल मंदिरात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त निवडुंग्या विठ्ठल मंदिरात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

महिला भवन उभारण्याचा संकल्प; सर्वांगीण विकासासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना

पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ जुलै २०२६ : देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन दिनानिमित्त पुणे शहरातील निवडुंग्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात शिवसेना नेत्या व आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा, काकड आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत भक्तिमय वातावरणात हा धार्मिक सोहळा संपन्न झाला.

यावेळी संवाद साधताना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहरातील महिलां साठी सर्व सुविधा असलेले स्वतंत्र महिला भवन उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.महिला सक्षमीकरणा साठी राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी महिला शेतकरी विधेयक आणि एकल महिला धोरणाची अंमलबजावणी ही महिलांच्या सन्मानाची आणि स्वाभिमानाची नवी दिशा असल्याचे सांगितले.

राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून विकासाभिमुख निर्णय सातत्याने घेतले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची प्रक्रिया लोकसभेत सुरू असून त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच न्याय मिळेल,असा विश्वासही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

मला पाचव्यांदा विधान परिषदेची सदस्य म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.त्याबद्दल शिवसेना उपमुख्यमंत्री व मुख्य नेते एकनाथ शिंदे व खा.श्रीकांत शिंदे यांचे आभार मानते.

त्याचप्रमाणे आज श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेचे भाग्य लाभले ही पवित्र संधी व शुभार्शिवाद महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला लाभावा आणि राज्यातील शेतकरी,महिला, युवक तसेच सर्व समाजघटकांचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी प्रार्थना मी विठ्ठल चरणी केली,असे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक विशाल धनवडे, विश्वस्त किशोर बाबर, मंदिर समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते, भजनी मंडळाचे सदस्य आणि भाविक उपस्थित होते.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. डॉ. राजेश फडे

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

Solapur WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.